uttar pradesh unnao woman found hanging in hospital on first day at work family alleges rape  Google
देश

कामाच्या पहिल्याच दिवशी घात; रुग्णालयाच्या छताला लटकलेली आढळली तरुणी

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या मागे एका तरुणीचा मृतदेह लोखंडी सळईला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत सापडल्याच्या एक दिवस आधीच या तरूणीने रुग्णालयात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी तरूणीच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

शनिवारी दुल्लापुरवा गावातील न्यू जीवन रुग्णालयात ही घटना घडली. नाझिया (19) असे मृत महिलेचे नाव असून ती तिकाना गावातील रहिवासी आहे. सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी ती शुक्रवारी रुग्णालयात रूजू झाली होती. दुसर्‍या दिवशी हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी नाझियाचा मृतदेह शोधून काढला, या तरूणीचा मृतदेह नुकत्याच सुरु झालेल्या रूग्णालयाच्या इमारतीच्या मागे लोखंडी सळईला लटकलेला आढळून आला. नाझिया त्या दिवशी नाईट शिफ्टमध्ये काम करत होती.

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, नाझिया शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये झोपली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे तिचा मृतदेह सापडला.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिची हत्या करून तिचा मृतदेह रुग्णालयाच्या मागे लटकवण्यात आला. नाझियाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालयात काम करणाऱ्या चौघांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT