Uttarakhand: 44 prisoners found HIV-positive in Haldwani jail  esakal
देश

Haldwani Jail: तुरुंग प्रशासन हादरलं! कारागृहात एका महिलेसह 44 कैदी HIV पॉझिटिव्ह

रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू

रुपेश नामदास

उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह ४४ हून अधिक कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही बाधित झाल्याने कारागृह प्रशासनाला धक्का बसला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासन याबाबत बोलायलाही तयार नाही. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी कसे पॉझिटिव्ह झाले, हे अजून पर्यंत कळू शकले नाही. (44 prisoners, including a woman, test positive for HIV in Haldwani jail)

कैद्यांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, महिन्यातून दोनदा रुग्णालयातील एक पथक नियमित तपासणीसाठी कारागृहात येते. ज्या कैद्यांना किरकोळ समस्या आहेत त्यांना जागेवरच औषध दिले जाते. अधिक गंभीर समस्या असलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार केले जातात.

एचआयव्हीबाधित कैद्यांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी कारागृह प्रशासन नियमित तपासणीही करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर एचआयव्ही रुग्णांसाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डॉक्टर नियमितपणे कैद्यांची तपासणी करतात. एखादा कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर मोफत उपचार केले जातात. डॉक्टरांच्या मते, एचआयव्हीची अनेक कारणांमुळे लागण होवू शकते. या प्रकारा बाबत जेल अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिक्रिया आली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर तुरुंग प्रशासन हादरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT