Uttarakhand Assembly Election 2022 sakal
देश

भाजपात बंडखोरीचे सूर; दहा नेत्यांची तिकीटे कापली

दहा नेत्यांची तिकीटे कापली; धामी खटिमातून

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज उत्तराखंडमधील ५९ उमेदवारांची घोषणा केली. मुख्यमंत्री पुष्कर धामी खाटीमा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरीचे सूर उमटत आहेत. ज्या १० बड्या नेत्यांची तिकीटे भाजपने कापली त्यातील बहुतांश नेत्यांनी बंडखोरीची घोषणा केली आहे. (Uttarakhand Assembly Election 2022)

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा विक्रम करणाऱ्या भाजपने उमेदवारी देताना अनेक दिग्गजांना किंवा त्यांच्या समर्थकांना डावलल्याने पक्षासमोरील डोकेदुखी वाढणार आहे. या राज्यात यंदा भाजपसमोर काँग्रेसचे प्रबळ आव्हान आहे. अनेक भाजप नेते नजिकच्या काळात काँग्रेसची वाट धरण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

बंडखोरांपैकी टीकाप्रसाद मैखुरी (कर्णप्रयाग) यांनी भाजपने फसवणूक केल्याचा जाहीर आरोप केला आहे. पक्षाने तिकीट देण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळल्याने आपण पक्षाच्या विरोधात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवप्रयागचे ज्येष्ठ नेते मगन सिंह बिष्ट यांनी तर पक्षाने विनोद कंडारी यांच्याविरोधात आरोप करताना भाजपने तिकीट विकल्याचा थेट आरोप केला.

भाजप युवा मोर्चाचे नेते सूरज घिल्डियाल यांनी धनसिंह रावत यांचे तिकीट कापल्याच्या निषेधार्थ पक्षाचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री डॉ. हरकसिंह रावत यांच्यापाठोपाठ तेही काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. वरिष्ठ नेते दर्जाधारी जगवीर सिह भंडारी (यमुनोत्री), प्रदेश संघटन मंत्री बलवीर घुनियाल, आदींनी बाहेरच्या उमेदवारांना तिकीट देताना भाजपने निष्ठावंतांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT