uttarakhand 
देश

Uttarakhand : एका आठवड्यानंतर तपोवन बोगद्यात सापडले दोन मृतदेह; 33 जणांचा शोध जारी

सकाळवृत्तसेवा

चमोली : उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमकडा तुटण्यामुळे महापूर आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वित्तहानीसह मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी झाल्याचीही शक्यता आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु आहे. बचावरकार्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीही उत्तराखंड पोलिस, SDRF आणि NDRF चे जवान बचावकार्यात सामील आहेत.  

उत्तराखंडमधील चमोलीतील दुर्घटनेच्या एका आठवड्यानंतर आता तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून दोन मृतदेह मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला मृतदेह सकाळी जवळपास पाच वाजता मिळाला. यानंतर थोडं आणखी खोदल्यानंतर दुसरा मृतदेह देखील प्राप्त झाला. मात्र, अद्यापही 33 बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.

या बोगद्यात काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या बोगद्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे की जेसीबीच्या द्वारे युद्धपातळीवर काम करुनही बचावकार्यात बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 164 लोक बेपत्ता आहेत. अद्याप रैणी आणि तपोवन भागातून 38 आणि बोगद्यातून दोन मृतदेह सापडले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : विद्यार्थी गावाकडे; स्पर्धा परीक्षांच्या अर्थचक्राला फटका; क्लास, अभ्यासिका, मेस आणि वसतिगृहांमधील विद्यार्थीसंख्या घटली

Pune News : नेहरू स्टेडियमबाहेर मोटारीत आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह

Khed News : केंद्रीय सचिव दिलीप कुमार यांच्याकडून खेडच्या पूर्व भागातील कामांची पाहणी

Dindori Drought : शेतकऱ्यांच्या मदतीच्या आशा पल्लवित! दिंडोरीतील दुष्काळाच्या तीव्रतेचे होणार सर्वेक्षण....

Shirur News : उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांच्याविरूद्ध १८ नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT