uttarakhand, joshimath, chamoli, glacier, dhauliganga, uttarakhand flood, tapovan, rishikesh news, alaknanda  
देश

उत्तराखंड : जीव मुठीत धरुन बसलेल्या 16 जणांची जवानांनी केली सुखरूप सुटका (VIDEO)

सकाळ ऑनलाईन टीम

उत्तराखंड येथील तपोवन परिसरातील बोगद्यामध्ये अडकलेल्या 16 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आयटीबीपीच्या जवानांना यश आले आहे. या ठिकाणी काही लोक अडकल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली होती. गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या सूचनेनंतर आयटीबीपीचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जीवाची बाजी लावून जीव मुठीत धरुन बसलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले. 

उत्तराखंड (Uttarakhand) येथील चमोली( Chamoli ) जिल्ह्यातील नीति खोऱ्यात हिमकडा कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे.  ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्यामुळे तपोवन बैराज परिसर पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून धौली नदीला महापूर आला आहे. चमोली स्थित तपोवन बोगद्याजवल 16 लोक अडकून पडले होते.  

उत्तराखंड येथील प्रलयकारी संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी  2-2 लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना 50-50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.  उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी देखील मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4-4 लाख रुपये मदत देणार असल्याचे म्हटले आहे. 

भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलातील प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तपोवन-रेनी परिसरात सुरु असलेल्या एका प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी 150 हून अधिक मजूरांचाॉ मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत आयटीबीपीच्या जवानांनी 10 मृतदेह काढले असून 16 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Sleeper Bus Gang-Rape : दिल्ली हादरली ! धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपी अटकेत

Satara District Bank: सातारा जिल्हा बँकेचा आखाडा तापला! २५० ठरावांमुळे उदयनराजेंचे पारडे जड, राजेंची ताकद अन् दिग्गजांची अडचण

Mumbai High Court: पूर्वलक्षी प्रभावाने लादलेली भाडेवाढ रद्द, मुंबई बंदर प्राधिकरणाला दणका

Marathi News Live Updates : पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड

Sugar Before Age 2: वयाच्या २ वर्षांपूर्वी मुलांना किती साखर देता? याचा परिणाम मोठेपणीही होतो; संशोधनात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT