उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांचा राजीनामा sakal
देश

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांचा राजीनामा

राज्यपाल बेबीराणी मौर्य यांच्या राजीनाम्याने उत्तर प्रदेशातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत

सकाळ वृत्तसेवा

डेहराडून/लखनौ (पीटीआय) : उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या शक्यतेने राजीनामा दिला असावा, अशी चर्चा आहे.

राज्यपाल बेबीराणी मौर्य यांच्या राजीनाम्याने उत्तर प्रदेशातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. कारण आजच त्यांनी राजीनामा दिला आणि आजच भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह प्रभारीची नियुक्ती केली. यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना नेमले आहे. बेबीराणी मौर्य यांनी उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून गेल्या २६ ऑगस्टला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. उत्तर प्रदेश भाजपमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. तसेच आता उत्तराखंडच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक होणार, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे.

मावळत्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांनी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. त्यांनी राज्यात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या मुद्द्यावर भर दिला. त्यांच्या मते, उत्तराखंडच्या महिला मेहनती आणि कष्टाळू आहेत. महिलांचे सक्षमीकरण हे राजभवनाच्या सहकार्यातून आणखी होऊ शकते आणि पुढेही प्रयत्न केले जातील. आग्रा येथील रहिवासी बेबीराणी मौर्य या उत्तराखंडच्या दुसऱ्या महिला राज्यपाल होत्या. त्यापूर्वी मार्गारेट अल्वा यांनी उत्तराखंडचे राज्यपालपद सांभाळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 Final: पाऊस असाच सुरू राहिला तर २०-२० षटकांची होईल फायनल! जाणून घ्या कधी व किती वाजता लागू होईल हा नियम...

VIDEO : मुद्दे मी देतो, तुम्ही आंदोलन करून दाखवा! 'मॅनेज झाले' म्हणणाऱ्यांना बच्चू कडूंनी चांगलंच झापलं, नेमकं काय दिलं उत्तर? वाचा...

ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनचा बॉलिवूड प्रथेवर 'या' स्टारकिडने मारली फुल्ली ! कारण सांगताना म्हणाली..

Motorola Edge 60 Fusion 50% डिस्काउंट! स्मार्टफोनवर चक्क 7 हजारची सूट..ऑफर पहा एका क्लिकवर.

Excess Painkiller Use Side Effects: पेनकिलरची सवय ठरू शकते आयुष्यभराची वेदना! डॉक्टरांचा सल्ला घेणं विसरू नका

SCROLL FOR NEXT