koshyari 
देश

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

डेहराडून - महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा भगत सिंह कोश्यारी यांचे नाव चर्चेत आलं आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कोश्यारी यांना आता उत्तराखंड उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली असून चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने अवमान प्रकरणी नोटीस पाठवली आहे. कोश्यारी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी कोश्यारी यांना चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. न्यायाधीश शरद कुमार शर्मा यांच्या पीठाने मंगळवारी डेहराडूनच्या एनजीओनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी ही नोटीस जारी केली.

याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका योग्य आहे. याचिका दाखल करण्याआधी सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आहेत. कोश्यारी यांना 60 दिवस आधी नोटीसही जारी केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी करताना नोटीस जारी करून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. 

उत्तराखंड उच्च न्यायालयाकडून माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांना सरकारी निवासस्थान तसंच सुविधांचा खर्च बाजार भावाप्रमाणे उर्वरीत रक्कम देण्याचे आदेश गेल्या वर्षी तीन मे रोजी दिले होते. आतापर्यंत कोश्यारी यांनी न्यायलयाच्या या आदेशाचे पालन केले नसल्याचा आऱोप याचिकाकर्त्याने केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT