Uttarakhand-Fire 
देश

डेहराडूनमधील ट्रेंचिंग मैदानाला भीषण आग; धुराच्या लोटांमुळे उडाला गोंधळ!

वृत्तसंस्था

डेहराडून : उत्तराखंडची राजधानी असणाऱ्या डेहराडूनच्या सहस्त्रधारा रोडवर स्थित ट्रेंचिंग मैदानावरील लाखो टन कचऱ्याला आग लागली होती. त्यामुळे काहीकाळ अनागोंदी माजली होती. अग्निशमन दलाच्या गाड्य़ा घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने भीषण रुप धारण केले होते. थोड्या वेळात आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, परिसरात धूर पसरल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. 

डेहराडूनच्या ट्रेंचिंग मैदानावर गेल्या काही वर्षांपासून लाखो टन कचरा पडून आहे. या मैदानावर डेहराडून शहरातील कचरा अनेक वर्षे टाकला जायचा. त्यानंतर शीशमबाडा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटने या प्रकरणी लक्ष्य घातल्यानंतर या मैदानावर कचरा टाकणे बंद झाले. मात्र, या मैदानावर पडून असलेल्या कचऱ्याचे कोणत्याही प्रकारची विल्हेवाट लावण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा कचरा मैदानावर तसाच पडून होता. उन्हाळ्याच्या दिवसात या कचऱ्याला अनेकदा आग लागली आहे. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. 

दरम्यान, सोमवारी (ता.२७) कचऱ्याला आग लागल्यानंतर उशिराने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धूराचे लोट पसरले होते. अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या ठिकाणी वारंवार आग लागण्याचे प्रसंग घडत असून यासंबंधीच्या तक्रारी स्थानिकांनी प्रशासनाकडे दिल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

नगर निगमचे मुख्य नगर स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर कैलाश जोशी म्हणाले की, उन्हाळ्याच्या दिवसात साठलेल्या कचऱ्यामध्ये मिथेन गॅसची निर्मिती होती. त्यामुळे वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. या ठिकाणीही वारंवार आग लागण्याचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर वेळीच लक्ष्य द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT