Rudraprayag Accident Esakal
देश

Rudraprayag Accident: एक डुलकी अन् क्षणात बस कोसळली दरीत...१४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Rudraprayag Accident: रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघात झाला. घटनेनंतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचेपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर काही वेळातच आणखी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंडमधील ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना राष्ट्रीय महामार्गावरील रतौली गावाजवळ घडली. काल(शनिवारी) सकाळी अकराच्या सुमारास एक टेम्पो ट्रॅव्हलर खड्ड्यात पडून त्यात प्रवास करणारे लोक गंभीर जखमी झाले.

या अपघातात 14 जणांचा मृत्यू

अपघातानंतर काही वेळात बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत घटनास्थळीच 10 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आणखी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर ऋषिकेश एम्समध्ये उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. बसमधून प्रवास करणारे पर्यटक चोपटा येथे दर्शनासाठी जात असताना यावेळी बस १५० मीटर खोल दरीत कोसळली.

ड्रायव्हरला लागली झोप

या घटनेला चालक जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. ड्रायव्हरला अचानक झोप लागली आणि यादरम्यान बस दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बस दरीत पडली तेव्हा सर्व पर्यटक झोपले होते. या प्रवाशामध्ये सुमारे २३ जणांचा समावेश होता. हे सर्वजण चोपटा-तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेकिंगसाठी जात होते.

प्रवासी 250 मीटर खोल दरीत कोसळले

बस कोसळेलेली दरी सुमारे 250 मीटर खोल आहे आणि ती अलकनंदा नदीच्या काठावर आहे. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल दु:ख व्यक्त केले असून स्थानिक प्रशासनाला आवश्क त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारही भीषण अपघाताची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून जिल्हाधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएचची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.

गृहमंत्री अमित शाह यांनीही या भीषण अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मिडीया X वर लिहिले, “उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये झालेल्या अपघाताची दुःखद बातमी मिळाली. या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले असून जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT