Uttarakhand  esakal
देश

Uttarakhand : उत्तराखंडमधील सर्व टनेल प्रोजेक्टची तपासणी होणार, उत्तरकाशी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

प्रतिकूल परिस्थितीतही बचावकार्य पूर्ण होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली

Pooja Karande-Kadam

Uttarakhand :

राज्यातील सर्व टनेल प्रोजेक्ट्सची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले आहेत. टनेल प्रोजेक्टची चाचणी केल्याने पुन्हा आपल्याला अशा अपघातांचा सामना करावा लागणार नाही, तसेच आम्ही शहरांच्या वहन क्षमतेचे देखील मूल्यांकन करत असल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या उत्तरकाशीमध्ये काम सुरू असलेल्या भुयारी प्रकल्पात 40 कामगार अडकले होते.

मसुरी, डेहराडून-टेहरीसह राज्यात अनेक प्रकल्प प्रस्तावित आणि विचाराधीन आहेत. याबाबत मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, केद्रीय पथके बचाव कार्यात गुंतले आहेत आणि राज्य सरकार त्यांना यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. ते आमच्याकडून आढावा घेत आहेत आणि माहिती घेत आहेत.

अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या एजन्सी आणि तज्ज्ञांशी संपर्क साधावा, अशा सूचना पंतप्रधान आणि केंद्र सरकार कडून देण्यात आल्या आहेत. असे सर्व लोक या मोहिमेची माहिती घेत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सर्वांना सुखरूप बाहेर काढणे महत्त्वाचे

भुयारात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा वापर केला जात आहे. याच्या मदतीने कामगारांना वाचवणे सहज शक्य होईल. तेथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री धामी यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुखरूप असल्याचे सांगितले. त्यांच्याशी सतत संपर्क साधला जात आहे. सर्वांसाठी अन्न, पाणी, ऑक्सिजनचे पंप यांची व्यवस्था करण्यात येत आहे. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या सर्वांना सुखरूप बाहेर काढणे हे आमचे पहिले लक्ष्य आहे.

भुयारी बांधण्याचे काम NHIDCL कंपनी करत आहे. बोगद्याचे काम लवकर पूर्ण होणार होते. बोगद्याचे केवळ 400 मीटरचे काम बाकी होते. तेच लोक त्यावर लक्ष ठेवून होते. मात्र यापुढील काळात अशा अपघाताचा सामना करावा लागू नये म्हणून काळजी घेतली जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांनी सकाळी सचिवालय गाठून उच्चपदस्थांची बैठक बोलावली. अधिकाऱ्यांना सांगितले, त्यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास सांगितले. बचाव मोहिमेची माहिती घेतली. आयुक्त गढवाल यांच्याकडून माहिती घेतली. बचाव कार्यात गुंतलेल्या केंद्रीय यंत्रणांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रतिकूल परिस्थितीतही बचावकार्य पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या बैठकीला एसीएस राधा रतुरी, सचिव आर मीनाक्षी सुंदर, गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे आणि माहिती महासंचालक बंशीधर तिवारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT