Uttarkashi Tunnel Rescue 
देश

Uttarkashi Tunnel Rescue: "हे कठीण मिशनच नव्हतं तर मानवतेसाठी युद्ध होतं"; बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

तब्बल १७ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना आज सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

उत्तरकाशी : हे एक कठीण मिशनच नव्हतं तर मानवतेसाठीच युद्ध होतं, अशा शब्दांत उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढणाऱ्या बचाव पथकातील एका अधिकाऱ्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Uttarkashi Tunnel Rescue It was not a difficult mission but a war for humanity Sentiments expressed by rescue team officials)

बचाव मोहिमेतील एक सदस्य तसेच स्क्वाड्रॉन इन्फ्रा मायनिंग प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ सिरीयक जोसेफ म्हणतात, "हे केवळ एक कठीण मिशन नव्हते तर मानवतेसाठी युद्ध होते. त्याचा एक भाग बनून आम्हाला आनंद होत आहे" उत्तरकाशी बोगद्यातून सर्व कामगारांना यशस्वीपणे बाहेर काढल्याबद्दल त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, तब्बल १७ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना आज सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं. यासाठी सरकारच्या एजन्सीजसह खासगी इंजिनिअरिंग कंपन्यांनी देखील बचावासाठी मोठे प्रयत्न केले. (Latest Marathi News)

एकाही कामगाराला कुठलीही इजा न होता बाहेर काढण्यात आल्यानं बचाव पथकांचं हे मोठं यश मानलं जात आहे. कामगारांच्या या सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT