Uttarkashi Tunnel Esakal
देश

Uttarkashi Tunnel: तब्बल ११ दिवसांनी ब्रश करून बदलले कपडे, बोगद्यात अडकलेल्या मजूरांनी सांगितला एक-एक दिवसाचा थरार

उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या मजूरांनी 11 दिवसांनी ब्रश करून बदलले कपडे

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंड येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी अद्याप प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, १२ ते १३ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांनी काल दात घासले आणि कपडेही बदलले. अत्यावश्यक खाद्यपदार्थांबरोबरच कपडे आणि औषधेही कामगारांना काल पाठवण्यात आली. एनएचआयडीसीएलचे एमडी महमूद अहमद म्हणाले की, कामगारांना चार आणि सहा इंची लाईफ पाईप्सद्वारे अन्नपदार्थ सतत पाठवले जात आहेत.

बुधवारी त्यांना रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री आणि केळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. टी-शर्ट, अंडरगारमेंट, टूथपेस्ट आणि ब्रशसोबतच त्यांना साबणही पाठवण्यात आला. कामगारांनी कपडे बदलले, हात धुतले आणि जेवण देखील केले.

संवाद साधण्याचीही केली व्यवस्था

आतापर्यंत बोगद्याच्या आतील कामगारांचे स्वरूप केवळ दुर्बिणीच्या कॅमेऱ्यांद्वारेच दिसत होते, मात्र बुधवारी दिवसभरात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने येथे ऑडिओ सिस्टीमही बसवली आहे. त्यासाठी बोगद्याच्या आत सहा इंची पाईपद्वारे मायक्रोफोन आणि स्पीकर पाठवण्यात आले. सर्व कामगारांशी बोलून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

सचिव डॉ. नीरज खैरवाल यांनी सांगितले की, दोन मजुरांनी बराच वेळ अन्न न खाल्याने पोटदुखीची समस्या जाणवत होती. पाईपद्वारे तात्काळ त्याच्याकडे औषधी पाठवण्यात आली आहेत. उत्तरकाशीतील सिल्क्यारा येथील बोगद्यात १२ तारखेपासून अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा पाईप त्यांच्या जवळ पोहोचला. परतुं काही समस्या निर्माण झाल्याने काही वेळ काम थांबले होते. आज कामगारांना बाहेर काढण्यात यश येईल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT