international tunnelling expert Arnold Dix  
देश

"मी काल परत मंदिरात गेलो कारण..."; 41 मजुरांचे प्राण वाचवणारे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांची भावनिक प्रतिक्रिया

Sandip Kapde

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात काल 17 व्या दिवशी रेस्क्यू टीमला मोठे यश मिळाले. तब्बल 400 तासांनंतर मंगळवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. सव्वा नऊच्या सुमारास सर्व 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सर्वप्रथम बोगद्यातून बाहेर आलेल्या सर्व मजुरांचे पुष्पहार घालून स्वागत केले. वैद्यकीय तपासणीनंतर सर्व कामगारांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्व कामगार निरोगी आहेत.

या सर्व ऑपरेशनमध्ये वाचवणारे हात मोठे होते. या 17 दिवसात अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करत रेस्क्यू टिमने आपले काम सुरु ठेवले. अखेर त्यांना यश मिळाले. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स म्हणतात," या ऑपरेशनमध्ये सेवा करणे हे माझ्यासाठी अभिमानस्पद आहे. तसेच एक पालक म्हणून काम केले. व एक पालक म्हणून सर्व मुलांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत करणे, हे माझ्यासाठी अभिमानस्पद आहे."

अरनॉल्ड डिक्स म्हणाले, "सुरुवातीला मी सांगितले होते की, 41 लोक घरी येणार आहेत. ख्रिसमसला सर्व घरी असतील, कुणालाही दुखापत होणार नाही. आता  ख्रिसमस लवकर येत आहे आणि मजूर त्यांच्या घरी असतील.  आम्ही शातं होतो आणि आम्हाला नेमके काय हवे आहे हे आम्हाला माहित होते. आम्ही एक अप्रतिम टीम म्हणून एकत्र काम केले. भारताकडे सर्वोत्कृष्ट अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा एक भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे." (Latest Marathi News)

"मी काल परत मंदिरात गेलो कारण जे घडले त्याबद्दल मी आभार मानण्याचे वचन दिले होते. जर तुमच्या लक्षात आले नसेल, तर आपण नुकताच एक चमत्कार पाहिला," असे अरनॉल्ड डिक्स म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT