UP Election Updates
UP Election Updates Sakal
देश

UP Election: भाजपात गळती सुरुच... योगींनी गमावला आणखी एक सहकारी

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारमधून बाहेर पडलेले मंत्री तसेच ओबीसी समाजाचे वरिष्ठ नेते दारासिंह चौहान यांनी रविवारी सपामध्ये प्रवेश केला. सपा आपले जुने घर आहे, अशी भावना व्यक्त करीत त्यांनी भाजपवर तोफ डागली. (Uttarpradesh Assembly Election Updates)

चौहान यांच्यासह अपना दलाचे (सोनेलाल) प्रतापगढ जिल्ह्यातील विश्वनाथगंज येथील आमदार आर. के. वर्मा यांनीही अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत सपाची लाल टोपी घातली. अपना दल (सोनेलाल) हा भाजपचा मित्रपक्ष आहे. याआधी स्वामीप्रसाद मौर्य आणि धरमसिंह सैनी यांच्यासह पाच भाजप आमदार शुक्रवारी सपामध्ये दाखल झाले होते.

चौहान म्हणाले की, ओबीसी आणि दलित समाज एकत्र आला असून आमच्या प्रतिस्पर्ध्याने प्रयत्नांची शिकस्त केली तरी त्यांना हे वादळ रोखता येणार नाही. चौहान हे मउ येथील मधूबनचे आमदार आहेत. दलित, ओबीसी तसेच बेरोजगारांना भाजप सरकारकडून न्याय मिळाला नाही, असा आरोप करीत ते बुधवारी योगी मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते.

चौहान यांनी २००९ मध्ये बसपाच्या तिकिटावर घोसी येथून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये भाजपच्या हरिनारायण राजभर यांनी त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला होता. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. ओबीसी मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

भाजपने सबका साथ-सबका विकास अशी घोषणा देत २०१७ मध्ये सरकार स्थापन केले. प्रत्यक्षात केवळ मुठभर लोकांचा विकास झाला आणि इतरांना नशिबाच्या हवाली सोडून देण्यात आले. आम्ही यूपीच्या राजकारणात बदल घडवून आणू. अखिलेश यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू.

- दारासिंह चौहान, माजी मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: 'या' मतदारसंघात जो पक्ष विजयी होतो तोच देशावर राज्य करतो; जाणून घ्या देशभरातील खास जागांची जादू

मुख्यमंत्र्यांपासून माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीपर्यंत मतमोजणीपूर्वीच 'या' राज्यात BJP 10 जागांवर विजयी; वाचा, नेमका काय आहे प्रकार

T20 World Cup 2024 : आजपासून रंगणार टी-20 वर्ल्ड कप थरार! पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध यजमान अमेरिकेने जिंकली नाणेफेक

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

T20 World Cup : अमेरिकेतील वातावरण क्रिकेटमय; बास्केटबॉल, बेसबॉलच्या देशात क्रिकेटचा बोलबाला

SCROLL FOR NEXT