Delhi Monkeypox Latest News Delhi Monkeypox Latest News
देश

Monkeypox: लस मंकीपॉक्सला रोखू शकत नाही; WHO चं महत्त्वाचं विधान

जगभरातील ९२ हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे ३५ हजाराहून अधिक रुग्ण आढळल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

WHO चे अधिकारी रोसामुंड लुईस यांनी गुरुवारी मंकीपॉक्स लसीबाबत एक महत्त्वाचं विधान केलंय. ते म्हणाले की मंकीपॉक्स लस हा रोग रोखण्यासाठी १०० टक्के प्रभावी नाही. अशा परिस्थितीत आता लोकांनी आपला संसर्गाचा धोका कमी करण्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.

माध्यमांशी बोलताना लुईस म्हणाले की, लस हा रोग पूर्णपणे रोखण्याचा मार्ग नाही. हा धोका कमी करण्यासाठी लसींवर अवलंबून राहू शकत नाही. सर्व लोकांनी या विषाणूपासून स्वतःचं संरक्षण करावं आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी.

जगभरातील ९२ हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे ३५ हजाराहून अधिक रुग्ण आढळल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे. त्याचवेळी या आजारामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. लुईस म्हणाले की मंकीपॉक्स रोखण्यासाठी या लसी १०० टक्के प्रभावी होतील अशी WHO अपेक्षा करत नाही.

WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, गेल्या आठवड्यात सुमारे ७,५०० रुग्ण नोंदवले गेले. हे प्रमाण मागील आठवड्यापेक्षा २० टक्के जास्त आहे. मंकीपॉक्सचे (Monkeypox) सर्वाधिक रुग्ण युरोप आणि अमेरिकेत नोंदवली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT