adar poonawalla file photo
देश

'लहान मुलांसाठी लस सहा महिन्यांत होणार उपलब्ध'

‘सीरम’चे आदर पूनावाला यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

‘सीरम’चे आदर पूनावाला यांची माहिती

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा धोका वाढत चालला असताना लहान मुलांसाठीच्या लशींवर विविध कंपन्या युद्धपातळीवर संशोधन करताना दिसत आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये लहान मुलांसाठीची लस बाजारात उपलब्ध होईल, अशा विश्वास ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. ते एका उद्योग परिषदेमध्ये बोलत होते.

‘‘ सध्या कोव्होव्हॅक्सच्या चाचण्या सुरू असून त्यामुळे तीन वर्षांवरील मुलांना संसर्गापासून संरक्षण मिळेल.’’ असा दावाही त्यांनी केला आहे. कोव्हिशिल्ड आणि अन्य कोरोना प्रतिबंधक लशी या केवळ अठरा वर्षे वयांवरील लोकांनाच दिल्या जात आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा सुदैवाने लहान मुलांवर फारसा प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नाही पण येत्या सहा महिन्यांमध्ये आम्ही लहान मुलांसाठीची लस बाजारामध्ये आणू, असे पूनावाला यांनी नमूद केले. भारतामध्ये दोन कंपन्यांना याआधीच लशींच्या निर्मितीसाठी परवानगी देण्यात आली असून त्यांची उत्पादने बाजारामध्ये येतील, असे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लशी या पूर्णपणे सुरक्षित असून पालकांनी मुलांचे लसीकरण करून घ्यावे. ज्यांना सरकारच्या घोषणेनंतर लसीकरण करून घ्यायचे आहे ते वाट पाहू शकतात. ‘कोव्होव्हॅक्स’च्या चाचण्यांमधून काही सकारात्मक निष्कर्ष आमच्या हाती आले आहेत.

- आदर पूनावाला,

सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट

संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करा

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता लोकसभा सदस्यांनी केंद्र सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे. बूस्टर डोससाठी केंद्राने वेगाने पावले उचलण्यासाठी रणनीती आखावी अशी सूचनाही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांनी आज हा मुद्दा उपस्थित करताना सरकारने कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे म्हटले आहे. तृणमूलच्या सौगत रॉय यांनी तातडीने बूस्टर डोस द्यायला सुरूवात करावी असे म्हटले आहे. कल्याण बॅनर्जी यांनी ब्रिटनमधील स्थिती मांडली.

राज्यात आठ ओमिक्रॉन बाधित

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटची लागण झालेले आणखी आठ रुग्ण सापडले असून त्यात मुंबईतील सात आणि वसई विरारमधील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील एकही व्यक्ती परदेशात गेली नव्हती अशी धक्कादायक बाब उघड झाल्याने यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २८ वर पोचली आहे.

देशातील ५५ टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले असून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस त्यांना मिळाले आहेत.

- मनसुख मंडाविया,

केंद्रीय आरोग्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT