देश

गर्भवती मातांच्या लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती

विनायक होगाडे

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलंय की, सध्या भारतातील कोरोनाच्या आकडेवारीमध्ये सातत्यपूर्ण अशी घट दिसून येत आहे. देशातील सध्याचा रिकव्हरी रेट हा 96.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगभरात सर्वाधिक लसीकरण पार पडलेल्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. अमेरिकेलाही मागे टाकत भारतात 163 दिवसांमध्ये 32 कोटी नागरिकांचं लसीकरण पार पडलं आहे. अमेरिकेला हा टप्पा गाठायला 193 दिवस लागले आहेत.

कोव्हॅक्सिन, कोविशील्ड, स्पुटनिक-व्ही आणि मॉडर्ना या चारही लशी स्तनापान करणाऱ्या मातांसाठी सुरक्षित आहेत. लशीचा आणि वंध्यत्वाची समस्या येण्याचा काही एक संबंध नाहीये, असंही नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के पॉल यांनी स्पष्ट केलंय. गर्भवती मातांच्या लशीकरणासंदर्भातील ऍडवायझरी लवकरच जाहिर केली जाईल. गर्भवती मातांसाठी लस सुरक्षित आहे तसेच आरोग्य मंत्रालय यासंदर्भात अधिक अभ्यास करत आहे, असंही ते म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित झालेली पहिली लस मॉडर्नाला आपत्कालीन वापारासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी मर्यादीत वापरासाठी आहे. सध्या कोव्हॅक्सिन, कोविशील्ड, स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या चार लशी उपलब्ध आहेत. फायझरसोबत देखील आम्ही लवकरच चर्चा संपवू. आतापर्यंत भारतात डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 51 रुग्ण नोंदवले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT