valentines day 2023
valentines day 2023  esakal
देश

Valentines Day 2023 : पत्नीच्या निधनाचे वृत्त समजल्यावरही वल्लभभाई पटेल कोर्टात लढत राहिले!

सकाळ डिजिटल टीम

सरदार वल्लभभाई पटेल देशाचे आयर्नमॅन म्हणूनही त्यांची ओळख आहे. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते.

वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय.

पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झाबेरभाई आणि आईचे नाव लाडबाई होते. पटेल यांचे साधे कुटुंब होते. पण, त्यांनी कामापेक्षा कधीही कुटुंबाला अधिक महत्त्व दिले नाही.

लहानपणीच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. त्याप्रमाणे वल्लभभाई देखील मोठे व्यक्ती होणार हे त्यांच्या लहाणपणातच समजले होते. एकदा त्यांच्या पायाला फोड आला होता. तो फोड बरा होण्यासाठी वल्लभभाईंना दवाखान्यात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी या फोडाला चटका दिला तर तो फुटेल आणि कायमचा बरा होईल, असे सांगितले.

त्यावर वल्लभभाईंच्या वडिलांनी याला विरोध केला. पोटच्या पोराच्या जखमेवर चटका देणं शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा वल्लभभाईंनीच सळी गरम करून पायाला चटका दिला.

वल्लभभाईंचे खरे प्रेम देश आणि ते करत असलेल्या कामावर होते. त्याची प्रचिती पुढील प्रसंगातून येते. कोर्टात कामकाज सुरू असताना पत्नीच्या निधनाची बातमी समजली तर कोणताही वकील हातातले काम सोडून जाईल. पण, वल्लभभाई तसे नव्हते.

१९०९ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्नी झवेरबा कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे काही काळ त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ऑपरेशन दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

झवेरबा यांच्या मृत्यूसमयी पटेल न्यायालयीन कामकाजात व्यस्त होते. कोर्टात वाद सुरू असताना एक व्यक्ती त्याच्याकडे आला आणि त्याने पेपरची चिट वल्लभभाईंना दिली. त्या चिठ्ठीत त्यांच्या पत्नीच्या निधनाची बातमी होती. हे कळल्यावरही त्यांनी ती चिठ्ठी कोटाच्या खिशात ठेवली. आणि कामकाज सुरूच ठेवले. त्या दिवशी ते खटला जिंकले. न्यायालयाचे कामकाज आटोपल्यावर त्यांनी पत्नीच्या मृत्यूची माहिती सर्वांना दिली. त्यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT