vehicle_ 
देश

वाहन धारकांना मोठा दिलासा; ड्रायव्हिंग लायसेंससह अन्य डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी वाढली

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रविवारी वाहन धारकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ड्रायव्हिंग लायसेंस, फिटनेस सर्टिफिकेट, आरसीसह अन्य डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. वाहन असणाऱ्या लोकांसाठी ही समाधानाची बातमी आहे. 

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आलंय की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील कामकाज ठप्प पडलं होतं. त्यामुळे अनेकांना आपले डॉक्युमेंट रिन्यू करता आले नाहीत. याच पार्श्वभूमीवर सरकारने डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांच्या डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी 31 मार्च 2020 ला संपणार होती, त्यांना आता पुढील वर्षाच्या 31 मार्चपर्यंत वेळ मिळणार आहे.

ड्रायव्हिंग लायसेन्स, वाहनाची फिटनेस व्हॅलिडिटी, रजिस्ट्रेशन इत्यादी डॉक्यूमेंट्सची व्हॅलिडिटी वाढवण्याचा निर्णय मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. यामुळे परिवहनसंबंधी सेवा वापरणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल, असं सरकारचं म्हणणं आहे. 

याआधी सरकारने कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणींमुळे वाहनासंबंधी डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी वाढवली होती. मागीलवेळी, ऑगस्ट महिन्यात सरकारने ड्रायव्हिंग लायसेंस, फिटनेस सर्टिफिकेट, आरसीसह अन्य डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी 31 डिसेंबरपर्यंत वाढवली. सुरुवातीला 30 जून, 30 सप्टेंबर आणि त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी वाढवण्यात आली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT