Vande Bharat Train
Vande Bharat Train सकाळ
देश

Vande Bharat Train: 'वंदे भारत'ने तोडला बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड; अवघ्या 52 सेकंदात 100 किमी स्पीड

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : भारतातील नवी वंदे भारत ट्रेनने बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड तोडला आहे. अवघ्या ५२ सेकंदात १०० किमीची स्पीड घेतल्याने वेगाच्या बाबतीत बुलेट ट्रेनला मागे टाकले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर हवेमधून पसरणाऱ्या रोगापासून वाचण्यासाठी यामध्ये यंत्रणा बसवली गेली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. लवकरच ही ट्रेन मुंबई-अहमदाबाद रस्त्यावर धावेल अशी माहिती आहे.

(Vande Bharat Train New Speed Record)

नव्या वंदे भारत ट्रेनच्या चाचणीनंतर रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, "वंदे भारतची तिसरी चाचणी गुरूवारी पुर्ण झाली. यावेळी १०० किमी पर्यंतचा वेग घेण्यासाठी फक्त ५२ सेकंदचा वेळ लागला. तर बुलेट ट्रेनला एवढा वेग घेण्यासाठी ५४.६ सेकंद लागतात. या नव्या वंदे भारतचा कमाल वेग हा १८० किमी प्रतितास एवढा आहे तर जुन्या वंदे भारतचा वेग हा १६० किमी प्रतितास एवढा आहे." अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितलं की, "आरामदायक प्रवासासाठी या ट्रेनमध्ये अनेक सुविधा आहेत. यामधील गुणवत्तामध्ये सुधारणा करण्यात आल्या असून या सर्व वैशिष्ठ्यांसह ट्रेनचा स्कोर हा ३.२ आहे तर जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट स्कोर हा २.९ इतका आहे." असं ते म्हणाले आहेत. लवकरच ही ट्रेन धावणार असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT