Clock tells time of 8 countries eSakal
देश

Special Clock : भाजीपाला विक्रेत्यानं तयार केलं खास घड्याळ; सांगतं तब्बल आठ देशांची वेळ

अनिलकुमार साहू असे या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच हे घड्याळ श्री राम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना भेट दिले.

सकाळ वृत्तसेवा

सर्जनशीलता किंवा नावीन्यतेला वय, शिक्षण आदींचे बंधन नसते. पूर्वीच्या टू इन वन म्युझिक सिस्टीमपासून प्रेरणा घेऊन येथील भाजीपाला विक्रेत्याने भारतासह जगातील आठ देशांची वेळ सांगणाऱ्या अनोख्या घड्याळांची निर्मिती केली आहे. अनिलकुमार साहू (वय ५२) असे या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच एक घड्याळ श्री राम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना भेट दिले.

या वैशिष्ट्यपूर्ण घड्याळामुळे भाजी मंडईतही साहू यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांबरोबरच इतर भाजीपाला विक्रेते, परिसरातील लोकही साहू यांच्याकडे या घड्याळाबद्दल चौकशी करत आहेत. हे . ७५ सेंमी व्यासाचे घड्याळ तीन हजार रुपयांचे आहे. या घड्याळाची वैशिष्ट्ये सांगताना साहू म्हणाले, की मला २०१५ मध्ये ओमानमधून एकाचा दूरध्वनी आला. त्यावेळी टाइम झोनबद्दल चर्चा झाली. या चर्चेतून विविध देशांची वेळ दर्शविणाऱ्या घड्याळांची निर्मिती करण्याची कल्पना सुचली.

या घड्याळाचा एकच काटा तास आणि मिनिटे दाखवितो. त्याचप्रमाणे, घड्याळाचा दुसरा काटा ते व्यवस्थित चालू आहे की नाही हे दर्शवितो. उदा. भारतात दुपारचे अडीच वाजले असतील तर दुबईत दुपारचे एक, टोक्योत संध्याकाळचे सहा आणि मॉस्कोत दुपारचे बारा, बींजिग व सिंगापूरमध्ये दुपारचे पाच आणि मेक्सिको शहरात पहाटेचे तीन आणि वॉशिंग्टन, न्यूयॉर्कमध्ये पहाटेचे चार वाजले असतील.

यावर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रकारच्या घड्याळांवर काम करण्यास सुरुवात केली. त्यातीलच एक राम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस राय यांना भेट दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही घड्याळ भेट देण्याची इच्छा आहे. देशासाठी काहीतरी वेगळे करण्याची लहानपणापासून इच्छा होती. जगातील प्रमुख देशांची निवड कली. मी २०१८ मध्ये सर्वप्रथम घड्याळ बनविले. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने घड्याळाला नोंदणी प्रमाणपत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.

घड्याळामध्ये जीएमटी वेळेचाही समावेश करायची इच्छा आहे, मात्र, त्यासाठी घड्याळात नेहमीच्या १२ तासांऐवजी २४ तासांची वेळ दाखवावी लागेल. जगातील आठ देशांची वेळ दाखविणाऱ्या घड्याळांबरोबरच भविष्यात २५ देशांची वेळ दर्शविणारे घड्याळ बनविण्याचीही साहू यांची इच्छा आहे.

आठवीनंतर सोडली होती शाळा

साहू यांनी आठवीनंतर शाळा सोडली होती. मात्र, पालकांच्या आग्रहानंतर इयत्ता नववीत प्रवेश घेतला. मात्र, अभ्यासाबद्दल निष्काळजी असल्याने दहावीत अनुत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे, शिक्षणाचे महत्त्व सांगणारेही कुणी नव्हते. त्यांचा इलेक्ट्रॉनिक उपकरणाकडे कल होता. त्यातूनच या घड्याळाच्या निर्मितीकडे त्यांची वाटचाल झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: भरदिवसा व्यावसायिकाच्या गाडीची डिकी तोडून 2.85 लाख लंपास

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT