Sakshi  
देश

Video: ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंचं टोकाचं पाऊल! गंगेच्या तीरावर दाखल, पदकं करणार विसर्जित

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना अद्यापही अटक झालेली नसल्यानं उद्वीग्न होऊन त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू हरिद्वार येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते आपली पदकं नदीच्या पाण्यात विसर्जित करणार आहेत. लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्यानं या खेळाडूंनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. (Video Extreme step taken by Olympic medal winning players decided medals will be immerse in Ganga river)

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून हे खेळाडू जंतरमंतर मैदानात आंदोलन करत आहेत. पण या आंदोलनाची दखल केंद्र सरकारनं घेतलेली नाही. या खेळाडूंची केंद्र सरकारमधील एकाही जबाबदार व्यक्तीनं भेट घेतलेली नाही, त्यांची विचारपूस केलेली नाही. उलट दिल्ली पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांचं आंदोलन चिरडून काढलं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांनी आता आपली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी हे खेळाडू आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर हरिद्वार येथील घाटावर दाखल झाले आहेत. मोठ्या कष्टानं आणि जीवाचं रान करुन मिळवलेली ही पदकं नदीच्या पाण्यात विसर्जित करणं देखील त्यांना कठीण जात आहे. ही पदक आपल्या छातीशी कवटाळून हे खेळाडू बसले आहेत. जणू एखाद्या सांत्वन सभेसारखं या ठिकाणी वातावरण तयार झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर होणार निर्णायक चर्चा ?

राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर आमदार निवासात राहण्याची वेळ, सव्वा वर्षापासून अधिकृत निवासस्थानाच्या प्रतीक्षेत

Latest Marathi News Live Update : वईतील आरे कॉलनीत बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीपोलिसांकडून तपास सुरू

नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

SCROLL FOR NEXT