देश

पाकिस्तान व्हायरल करतंय जुना व्हिडिओ; पण खरं काय घडलं...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि तेथील माध्यमं बिथरली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानी सोशल मीडिया आणि तेथील अधिकृत सरकारी मीडियाकडूनही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

पाकिस्तानने बुधवारी सकाळी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. त्यावेळी, भारताचे दोन विमान पाडल्याचा खोटा दावा तेथील मीडियाकडून व लष्कराकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायू सेनेच्या जुन्याच विमानांचे फोटो आणि एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आला आहे.

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ उद्धस्त केल्याने पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने आज भारतात घुसून प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण, भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला. यावेळी पाकच्या माध्यमांकडूनही भारताची दोन विमाने पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यासोबत जोधपूर येथे 2016 मध्ये क्रॅश झालेल्या भारतीय विमानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. तर या पसरविण्यात येणाऱ्या फेकन्यूजमध्ये एक व्हिडीओ ओडिशामधील विमान अपघाताचा असून काही फोटो राजस्थानच्या बारनेर येथील विमान अपघाताचे आहेत. 
 

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयानेही खोटाच व्हिडीओ शेअर करत हा दावा केला आहे. तर पाकिस्तान रेडिओच्या ट्विटर अकाऊँटवरुनही ही खोटी बातमी पसरवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या मीडिया आणि सरकारकडून या खोट्या बातम्या पसरविण्यात आल्याने तेथील सोशल मीडियावरही हा व्हिडीओ अन् फोटो व्हायरल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT