rakesh tikait 
देश

VIDEO : शेतकरी नेते राकेश टिकैत झाले संतप्त; थेट लगावली एकाच्या श्रीमुखात

सकाळवृत्तसेवा

गाझीपूर : प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर शेतकरी नेत्यांवर केंद्र सरकारने दबाव वाढवला आहे. हे आंदोलन लवकरात लवकर गुंडाळलं जावं, म्हणून सरकार हरतर्हेने प्रयत्न करताना दिसून येत आहे. हे आंदोलन गुंडळालं जाईल, अशीच शक्यता वाटत असताना आज मात्र चित्र बदललेलं दिसून येतंय. अशातच भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी एका व्यक्तीच्या थेट श्रीमुखात लगावल्याची घटना समोर आली आहे. 
 
एका व्यक्तीवर घुसखोर असल्याचा आरोप करत त्यांनी त्या व्यक्तीच्या चक्क कानाखालीच लगावली आहे. संबंधित व्यक्ती व्यासपीठावर चढत होती. त्याला तेथील शेतकऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती व्यक्ती व्यासपीठावर  चढण्याचा प्रयत्न करत राहीली. दरम्यान राकेश टिकैत यांना राग अनावर झाला आणि त्यांनी संबधित व्यक्तीच्या जोरदार कानाखाली लगावली. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. 

काल गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना आंदोलन स्थळ रिकामं करण्यासाठी नोटीस देखील प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. मात्र, काहीही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी दाखवून दिला होता. काल उशीरा रात्री या संदर्भातील हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. जोवर कायदा मागे घेणार नाही तोवर आम्ही हटणार नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. याचदरम्यान “व्यासपीठावर घुसणारा भाजपचाच घुसखोर होता. जे कोणी इथे वाईट हेतूने आले आहे त्यांनी निघून जावे,” असे राकेश टिकैत यावेळी म्हणाले.

हेही वाचा - सरकार बॅकफूटवर; आंदोलन सुरुच राहिल, ठाम निर्धारासह शेतकऱ्यांचा पुन्हा ठिय्या
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी या रॅलीला हिंसक वळण लागल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन आणि दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीस गृहसचिव, दिल्ली पोलिस अधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. व या बैठकीत अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त कंपन्या दिल्लीत तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT