Uttar Pradesh
Uttar Pradesh ANI
देश

धक्कादायक! PPE किटसह कोरोना मृताचं शव टाकलं नदीत (Video)

वृत्तसंस्था

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीएमओ डॉ. विजय बहादुर सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताचा भाचा आणि अन्य एकाविरुद्ध महामारी अधिनियम आणि अन्य कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलरामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं होतं. याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांना बसला. उत्तर प्रदेशमध्ये तर कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या किनारी आढळून आले. आता उत्तर प्रदेशमधील आणखी एक अशाच प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे. दोन व्यक्ती कोरोना संक्रमित व्यक्तीचा मृतदेह राप्ती नदीमध्ये टाकत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. (Video viral man throws covid patients body in river in Uttar Pradesh Balrampur)

एल-टू हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या एका वृद्धाचा शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. शनिवारी (ता.२९) मृत व्यक्तीच्या भाच्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घातलेली दिसत असून दुसरी व्यक्ती पीपीई किटशिवाय दिसत आहे. दोघे मिळून हा मृतदेह नदीमध्ये फेकत असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीएमओ डॉ. विजय बहादुर सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताचा भाचा आणि अन्य एकाविरुद्ध महामारी अधिनियम आणि अन्य कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेमनाथ मिश्रा (वय ६८, रा. मनकौरा काशीराम) असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. तर मृतदेह घेऊन जाणाऱ्या तरुणाचं नाव संजय शुक्ला असं आहे.

एल-टू नोडल अधिकारी डॉ. ए.पी.मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शुक्ला यांनी बौद्ध परिपथ येथील राप्ती नदी घाटावर मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली होती. थोड्या वेळाने काही लोक स्कॉर्पिओ गाडीमधून मृतदेह नेण्यासाठी आले होते. रुग्णवाहिका चालकाला राप्ती नदी घाटावर मृतदेह नेण्यास परवानगी दिली होती.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT