देश

मंदिर मस्जिद वादावर आशुतोष राणांचं काव्यमय उत्तर, व्हिडिओ व्हायरल

चार वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ असून तत्कालीन परिस्थितीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात एका बाजुला महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच दुसरीकडे हनुमान चालिसा, ज्ञानवापी मशिद, मथुरा, औरंगजेब कबर याशिवाय जात-धर्माच्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. सध्याच्या या परिस्थितीत आशुतोष राणा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चार वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ असून तत्कालीन परिस्थितीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. देशातील वातावरणाबाबत त्यांनी तेव्हा व्यक्त केलेलं मत आजही लागू होत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या व्हिडिओत एका खासगी वृत्तसंस्थने त्यांची मुलाखत घेतली आहे. सध्या देशाची हवा कशी आहे? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, काही निर्णयांमुळे राग येतो कधी कधी रागांमुळेही बदल घडत असतो. एक अभिनेता म्हणून तुम्ही याकडे कसे पाहता यावर राणा म्हणाले की, कोणताही कलाकार नऊ रसांचे जीवन जगतो असतो. त्यापैकी एकही रस निघून गेला तर जगण्यात मजा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

यावेळी राणा यांनी एका हिंदी कवितेच्या काही ओळीतून भाष्य केलं होतं. जमीनीचे तुकडे केलेत, चंद्र ताऱ्यांचं काय? नद्यांना नावं दिलीत पण वाहणाऱ्या पाण्याचं काय? भगवान शंकराची गंगासुद्धा पाणीच आहे. मुल्ला, पंडित हेसुद्धा पाणी पितात त्याचा धर्म काय असेल? या सर्वांना विचारा की सूर्य वेगळा बनवणार का असे अनेक प्रश्न त्यांनी हिंदी कवितेतून व्यक्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Expressway Protest: निवडणुका झाल्यानंतर शक्तिपीठ रेटण्याचा प्रयत्न, सतेज पाटील, राजू शेट्टी, करणार राज्यभर आंदोलन

Solapur : मारायचं होतं सासूला, पण पतीचा मृत्यू; प्रेमप्रकरणातून विषप्रयोग, पत्नी अन् प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर रमले शेतात

ट्रकची पोलिसांच्या गाडीला धडक, ५ जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

Suryakumar Yadav: भारतीय संघाच्या तयारीवर सूर्यकुमार यादवचा विश्वास; अभिषेक शर्माच्या फटाक्याची तयारी

SCROLL FOR NEXT