Chanda Kochar  Sakal
देश

ICICI Bank Loan Case : कोचर दाम्पत्य, ICICI अन् व्हिडिओकॉनचं नेमकं प्रकरण काय?

चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्यानंतर आता व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

CBI Arrest Videocon Chairmen Venugopal Dhoot : व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज आणि त्यातीस अनियमिततेचा ठपका ठेवलत आयासीआयासीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती.

त्यानंतर आज व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. चंदा कोचर, आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉनमधील हे प्रकरण नेमकं काय आहे. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

चंदा कोचर यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन आणि हितसंबंधांसाठी व्यवहार केल्याचे काही आरोप ठेवण्यात आले आहेत. पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याचाही त्यांच्या आरोप आहेत.

नेमकं प्रकरण काय?

ICICI बँकेने धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिले होते. याशिवाय कर्जाखाली दबलेल्या व्हिडिओकॉन समूहाला 20 बँका आणि काही आर्थिक संस्थांनीदेखील 40 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते.

दरम्यान, ऑक्टोबर 2016 मध्ये धूत यांच्या समूहातील गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित ICICI बँकेच्या कामकाजावर संशय व्यक्त केला होता. तसेच व्हिडिओकॉनला देण्यात आलेल्या कर्जामागे हितसंबंधांचा गैरवापर होत असल्याचही शक्यता व्यक्त करण्या आली होती.

2012 मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले. ज्यात दीपक कोचर यांचा ५०% हिस्सा आहे. आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेले हे कर्ज नंतर एनपीए झाले आणि नंतर या प्रकरणाला "बँक फ्रॉड" असे म्हटले गेले. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचर यांना अटक केली होती.

2012 मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले. ज्यात दीपक कोचर यांचा 50 % हिस्सा आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेले हे कर्ज नंतर एनपीए झाले आणि नंतर या प्रकरणाला "बँक फ्रॉड" असे म्हटले गेले. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचर यांना अटक केली होती.

दरम्यान, धूत यांच्या कंपनी व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या नुपॉवर या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये पैसे गुंतवल्याचाही आरोप आहे.

2019 मध्ये न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण समितीचा अहवाल आला. ज्यामध्ये कोचर यांनी व्हिडिओकॉनला कर्ज देताना बँकेच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे समितीच्या चौकशीत आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT