HD Kumaraswamy esakal
देश

Vijay Tata : 'केंद्रीय मंत्र्यानं 50 कोटींसाठी मला जीवे मारण्याची धमकी दिली'; विजय टाटांचा गंभीर आरोप

HD Kumaraswamy : तक्रारीत विजय टाटा यांनी विधान परिषद सदस्य रमेश गौडा यांनीही माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मी इतके पैसे देऊ शकत नाही. मी थोडा अडचणीत असल्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी वारंवार पैशांची मागणी चालूच ठेवली, मला धमकावले, असा आरोप विजय टाटा यांनी केला आहे.

बंगळूर : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी ५० कोटी रुपये देण्यासाठी आपल्याला धमकावले, अशी तक्रार व्यापारी व धजदचे सोशल मीडिया उपाध्यक्ष विजय टाटा यांनी बंगळूर येथील पोलिस ठाण्यात (Bangalore Police Station) दिली आहे. पैशांसाठी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याच तक्रारीत विजय टाटा यांनी विधान परिषद सदस्य रमेश गौडा यांनीही माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करून या दोघांपासून माझे व माझ्या कुटुंबाचे रक्षण करावे, अशी विनंती करून पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

बंगळूर येथे बुधवारी (ता. २) पत्रकार परिषद घेऊन कुमारस्वामी यांच्यावर विजय टाटा यांनी आरोप केले व त्याच दिवशी अमृतहळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मागील २४ ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घरी आलेल्या रमेश गौडा यांच्याशी चन्नपटण विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. निखिल कुमारस्वामी यांच्यासाठी चन्नपटनचे तिकीट अंतिम आहे. पोटनिवडणुकीत सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. त्याचवेळी रमेश गौडा यांच्या मोबाईलवर कुमारस्वामी यांचा फोन आला. गौडा यांच्याशी काही वेळ चर्चा केल्यानंतर कुमारस्वामींनी विजय टाटा यांच्याशीही चर्चा केली. त्यावेळी अर्थसाह्याची मागणी केली. त्यानंतर माझ्यावर पैशांसाठी दबाव टाकण्यात आला.

पण, मी इतके पैसे देऊ शकत नाही. मी थोडा अडचणीत असल्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी वारंवार पैशांची मागणी चालूच ठेवली, मला धमकावले, असा आरोप विजय टाटा यांनी केला आहे. मी पैसे देऊ शकत नसल्याचा राग कुमारस्वामी यांना आला. पैसे न दिल्यास तुझा प्रकल्प पूर्ण करू देणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. रमेश गौडा यांनीही मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये मागितले होते. मी म्हणालो की, पैसे देणे खूप कठीण आहे. मात्र, रमेश गौडा एक आठवड्यापासून कॉल आणि मेसेज करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT