kargil war vikram batra sher shah esakal
देश

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा खरा खुरा शेर शाह कोण होता ?

Kargil War hero Vikram Batra: विक्रम यांची हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीत मर्चन्ट नेव्हीमध्ये विक्रम यांची निवड झाली होती, पण त्यांनी सैन्यात जायचा मार्ग स्वीकारला.

सकाळ डिजिटल टीम

आज कारगिल विजय दिवस. सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस. या कारगिल युद्धाच्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक शिल्पकार होते कॅप्टन विक्रम बत्रा ..

विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी हिमाचल प्रदेश मधील पालमपूर या गावात झाला. विक्रम बत्रा लहानपणापासूनच साहसी व निर्भीड होते. एकदा त्यांनी स्कूलबसमधून पडलेल्या मुलीचा जीव वाचवला होता.

असंही सांगितल जातं की, दूरदर्शन वाहिनीवरून 1985 साली प्रसारित होणाऱ्या 'परमवीर चक्र' या मालिकेमुळे विक्रम यांच्या मनात भारतीय सैन्यामध्ये जायची इच्छा निर्माण झाली होती.

पुढे विक्रम यांची हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीत मर्चन्ट नेव्हीमध्ये विक्रम यांची निवड झाली होती, पण त्यांनी सैन्यात जायचा मार्ग स्वीकारला.

1999 साली जेव्हा कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानने भारताच्या भूमीवर कब्जा केला होता, तेव्हा त्यावेळी लेफ्टनंट असलेल्या विक्रम बत्रा ह्यांना 19 जून 1999 रोजी शिखर 5140 वर परत ताबा मिळवण्याची ऑर्डर मिळाली होती. कारण शिखर 5140 च्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याचा कॅम्प होता, ज्यात पाकिस्तानने अनेक सैनिक त्या शिखराच्या सुरक्षेसाठी ठेवले होते.

'ये दिल मांगे मोअर'

विक्रम बत्रा यांच्या आवाजात पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी वायरलेसवरून एक संदेश मिळाला - 'ये दिल माँगे मोअर' कारगिलमधील त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल योगेश जोशी यांनी विक्रम आणि लेफ्टनंट संजीव जामवाल यांच्यावर 5140 शिखरावरची चौकी ताब्यात घ्यायची जबाबदारी दिली होती. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत करत बत्रा आणि त्यांची टीम शिखरावर सही सलामत पोचले आणि त्यांनी शिखर 5140 काबीज केले.विक्रम बत्रा यांच्या टिमने त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी उत्साहाने आणि भरभरून साथ दिली. त्यांचे हे शिखर काबीज करण्याचे मिशन हे भारतीय इतिहासातील सर्वात कठीण मिशन समजले जाते.

असं म्हणतात की, शत्रू असलेल्या पाकिस्तानी सैन्यामध्ये बत्रा यांच्याविषयी इतका दरारा होता की पाकिस्तानी सैन्यात जेव्हा सांकेतिक शब्दात संदेशांची देवाण घेवाण चालत असे तेव्हा बत्रा ह्यांचा उल्लेख ‘शेर शाह’ असा केला जात होता.

फोनवरचे संभाषण..

शिखर 5140 म्हणजे "टायगर हिल" काबीज केल्यानंतर भारताची काश्मीर खोऱ्यात पकड मजबूत झाली. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर बत्रांनी त्यांच्या वडिलांना फोन करून कळवले होते की त्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.तेव्हा त्यांना माहित नव्हते की आपल्यावर ह्या पेक्षाही मोठी व कठीण जबाबदारी देण्यात येणार आहे.

शिखर 5140 काबीज केल्याच्या बरोबर 9 दिवसांनंतर बत्रांनी अजून परत एकदा घरी एक फोन करून सांगितले की मी तातडीच्या एका मिशनवर जात आहेत. त्यांच्यावर आता शिखर 4875 परत काबीज करण्याची महत्वाची जबाबदारी सोपवलेली होती.

हे शिखर काबीज करणे अत्यंत कठीण होते कारण ह्या शिखरावर म्हणजेच समुद्र सपाटीपासून 16000 फुटांवर पाकिस्तानी शत्रू दबा धरून बसले होते आणि हे शिखर चढण्यास अत्यंत कठीण होते.

वातावरणात प्रचंड धुके असल्यामुळे आपल्या सैनिकांची चढाई आणखी कठीण कठीण होत चालली होती. हे खूप मोठे दुदैव की ह्या मिशनवर गेल्यानंतर ते परत कधीच घरच्यांशी संपर्क साधू शकले नाहीत.

शिखरावर दबा धरून बसलेल्या शत्रू सैन्याला विक्रम बत्रा आणि त्यांच्या टीमच्या आगमनाची कुणकुण लागताच त्यांनी जोरदार हल्ला केला. ह्या हल्ल्यात बत्रा हे गंभीर जखमी झाले. त्यांचे सहकारी असलेले अनुज नय्यर ह्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढा देण्याचा प्रयत्न केला.

ती 7 जुलै 1999 ची काळीरात्र ...

8 जुलै 1999 ला सकाळी भारताने शिखर 4875 काबीज केले परंतु विक्रम बत्रा ह्यांच्या सारखा पराक्रमी कॅप्टन मात्र देशाने गमावला होता.

पुढे मग हजारो लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडून परमवीर चक्र मिळाले...

भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार असणारं परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलं. 26 जानेवारी 2000 रोजी विक्रम यांचे वडील गिरधारीलाल बत्रा यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. कॅप्टन बत्रा हे अतिशय निर्भीड आणि आव्हानांना न घाबरणारे होते. वयाच्या अवघ्या 24-25 व्या वर्षी स्वतःच्या स्वार्थाचा, परिवाराचा, सुरक्षेचा कुठलाही विचार न करत केवळ मातृभूमीसाठी प्राण कुर्बान करणारे विक्रम बत्रा तरुणांसाठी कायमचे आदर्श निर्माण करून गेले आहेत.

आपल्या साथीदारांचा व त्यांच्या परिवाराचा विचार करणारे बत्रा ह्यांनी देशाला देव मानून त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. ह्या मिशन दरम्यान त्यांच्या बरोबर असणाऱ्या सुभेदाराला ते म्हणाले

"तू बाल बच्चेदार आदमी है, तू पीछे हट"

आणि शत्रूच्या हल्ल्याचा सामना त्यांनी स्वतः करून आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT