Vikram Sarabhai  esakal
देश

Vikram Sarabhai : विक्रम साराभाईंच्या मृत्यूचे गुढ अद्याप उकललेच नाही?

देशातील वातावरण असे होते की डॉ.साराभाईंच्या निधनावर अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या होत्या

सकाळ डिजिटल टीम

भारतातील एक महान भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ विक्रम अंबालाल साराभाई यांची ओळख भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक अशी ओळख आहे. विक्रम साराभाई यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी करिता त्यांना भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अशा या थोर व्यक्तीची आज पुण्यतिथी आहे.

विक्रम साराभाई यांनी केलेल्या अंतराळ संशोधन संस्थेच्या पायाभरणीमुळे आज आपला देश जगात अंतराळ संस्थेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. असे असले तरी आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांचे स्मरण करत आहे. त्यांच्या मृत्यूच्या वेळी परिस्थिती अत्यंत वेगळी होती. त्यावेळी देशातील वातावरण असे होते की डॉ.साराभाईंच्या निधनावर अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या होत्या. काय होते ते प्रकरण पाहुयात.

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ ला अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात झाला. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले.

लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची साराभाईंना आवड होती. इंटरमिडीएट विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विक्रम साराभाईंनी अहमदाबाद च्या गुजरात महाविद्यालयातून मेट्रिक पूर्ण केले.

पुढे ते इंग्लंडला निघून गेले आणि तेथील कैम्ब्रीज युनिवर्सिटीच्या सेंट जॉन महाविद्यालय मधून उच्चशिक्षित झाले. 1940 साली साराभाईंना प्राकृतिक विज्ञानात त्यांच्या योगदानासाठी कैम्ब्रीज इथं ट्रीपोस देण्यात आला. पुढे दुसऱ्या विश्वयुद्धाचे वारे वाहू लागल्याने विक्रम साराभाई भारतात परतले आणि भारतीय विज्ञान संस्था बैंगलोर इथं सर सी.व्ही. रमण (नोबेल पुरस्कार विजेता) यांच्या मार्गदर्शनात अवकाशातील किरणांवर संशोधन सुरु केलं.१९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.

30 डिसेंबर 1971 रोजी भारताने इंडो-पाकिस्तानच्या युद्धात पाकिस्तानला माती चारली होती.पाकिस्तानच्या जाचातून सुटून बांगलादेश हे नवे राष्ट्र बनले होते. भारत अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा विचार करत होता. पण दुस-या दिवशी अचानक वृत्तपत्रे डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी संपूर्ण देशाला देतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.

साराभाई रशियन रॉकेटचे प्रक्षेपण पाहिले आणि थुंबा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केल्यानंतर ते विश्रांती घेण्यासाठी आवडत्या हॉटेलमध्ये गेले होते. तिरुवनंतपुरममधील ‘कोवलम बीच’ हे त्यांचे आवडते रिसॉर्ट होते. तिथून ते येथून मुंबईकडे रवाना होणार होते.

३० डिसेंबरलाच डॉ. साराभाईंना स्पेस लॉन्च व्हेईकलच्या डिझाईनचा आढावा घ्यायचा होता. निघण्याच्या एक तासापूर्वी त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. या संभाषणाच्या तासाभरात 52 वर्षीय डॉ.साराभाई यांचे निधन झाले. हा भारतीय लोकांसाठी मोठा धक्का होता.

इतके शोध अन् संशोधन करणाऱ्या या महान शास्त्रज्ञाच्या मृत्यू कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाहीय. त्यांचे निकटवर्तीय सहकारी पद्मनाभन जोशी सांगतात की डॉ. साराभाईंना विमानातून प्रवास करावा लागल्यास त्यांना आरामदायक व्हावे यासाठी त्यांच्या शेजारची सीटही रिकामी ठेवण्यात येत होती. काही कारणास्तव त्यांना रेल्वेने प्रवास करावा लागला. तर त्याच्यासोबत एक संपूर्ण टीम तैनात असायची.

डॉ. साराभाई यांची मुलगी मल्लिका साराभाई यांनी लिहिलेल्या पुस्तकात लिहिले आहे की, आम्हाला त्यांचे शवविच्छेदन करण्याचे कोणतेही कारण दिसले नाही. तर,  दुसरीकडे त्यांचा मुलगा कार्तिकेय यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शवविच्छेदन न करण्याचा निर्णय त्यांच्या आजीचा म्हणजेच डॉ. साराभाईंच्या आईचा होता. पण विक्रमजींच्या IIM अहमदाबादच्या सहकारी कमला चौधरी यांनी सांगितले होते की, अमेरिका आणि रशियन हेर माझ्यावर लक्ष ठेऊन आहेत, असे स्वत: साराभाईंनीच सांगितल्याचे कमला म्हणाल्या होत्या.डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आपल्या जवळ भारतीय अंतराळ अनुसंधान संघटन म्हणजेच ISRO सारखी विश्वस्तरीय संघटना आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : चालत्या रुग्णवाहिकेतून मृतदेह रस्त्यावर फेकला!… नेमंक काय घडलं? धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

काजोल अचानक इतकी गोरी कशी झाली? स्वतः सांगितलं कारण; म्हणाली, 'ते काम करणं बंद केलं आणि...'

Latest Maharashtra News Updates : : नवले हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचा संप; वेतन थकविल्याने संताप

तरुणाईला वेड लावणारा अनित-अहानचा सैयारा 'या' तारखेला येतोय ओटीटीवर; कधी आणि कुठे घ्या जाणून?

Malegaon News : धर्माच्या आधारावर मतं मागितल्याचा आरोप; आमदार मुफ्ती इस्माईल यांना दहा हजार दंड

SCROLL FOR NEXT