Villagers caught Lovers in an offensive position Villagers caught Lovers in an offensive position
देश

मुलगी पाया पडून म्हणाली ‘सोडून द्या’; प्रेमीयुगुलाला पकडले आक्षेपार्ह अवस्थेत

सकाळ डिजिटल टीम

बिहारच्या गया जिल्ह्यात प्रेमीयुगुलाला (Lovers) मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण कोंच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जिथे कडाक्याच्या उन्हात शेताच्या काठावर निर्जन ठिकाणी गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. मुलगी गावकऱ्यांच्या पाया पडते आणि सोडून द्या, अशी विनवणी करते. मात्र, गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला आणि व्हायरल केला. (Villagers caught Lovers in an offensive position)

गर्दीतून कोणीतरी प्रेमीयुगुलाची (Lovers) जात आणि पत्ता विचारत आहे. जात आणि पत्ता चुकीचा सांगितल्याच्या संशयातून एकाने तरुणाला थापड मारली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणीची जात विचारली जाते आणि नंतर पत्ता विचारला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर गावकरी दोघांचे लग्न लावण्याचे बोलतात. मात्र, मुलगी लग्नाला तयार होत नाही.

गावकऱ्यांना तरुण सांगतो की, मुलगी भावाची मेहुणी आहे. जमावाने तरुणाच्या दुचाकीच्या चाव्याही हिसकावून घेतल्या. चुकीची जात आणि पत्ता सांगितल्यामुळे जमावातील काही लोक मुलीच्या चेहऱ्यावरून दुपट्टा ओढतात. त्यावर मुलगी गावकऱ्यांच्या पाया पडते आणि सोडून द्या, अशी विनवणी करते. गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ (Video viral) तयार केला आणि व्हायरल केला.

मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली आहे. हा व्हिडिओ गयाच्या कोंच पोलिस स्टेशन परिसरातील आहे. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे गयाचे अतिरिक्त एसपी मनीष कुमार यांनी सांगितले. मी नातेवाइकासोबत गेली होती. वाटेत गावातील काही लोकांनी गैरवर्तन केले, असे मुलीने पोलिसांना सांगितले. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! दसऱ्याआधी खरेदीदारांना मोठा दिलासा; पाहा मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील भाव

Police Awareness: ‘पोक्सो’पासून ‘डायल ११२’पर्यंत; ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागातील मुलींना कायद्याची माहिती देणार पोलीस

Bombay Shieldtail Snake : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत मोलाची भर! दोडामार्गमध्ये आढळला अत्यंत दुर्मीळ 'बॉम्बे शिल्डटेल' साप, सर्पमित्रांनी केले निरीक्षण

Latest Marathi News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; आरोपीच्या शोधासाठी ९ पथके सक्रिय

Tourism: वॉटर स्पोर्ट्सपासून विलेज टुरिझमपर्यंत; टिहरी सरोवराला ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन बनवण्याची तयारी

SCROLL FOR NEXT