Violence during Voting for Lok Sabha Election 2024 Stone pelting West Bengal Manipur BJP TMC workers marathi news  
देश

Lok Sabha Election : बंगाल, मणिपूरमध्ये मतदानाला हिंसाचाराचे गालबोट! तीन मतदारसंघात भाजप-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले

Lok Sabha Election : पश्‍चिम बंगालमध्ये कूचबिहार, अलिपूरदास आणि जलपाईगुडी या तीन मतदारसंघात हिंसाचार झाला.

सकाळ वृत्तसेवा

कूचबिहार : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज बहुतांश ठिकाणी उत्साहात आणि शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली असली तरी काही ठिकाणी मात्र हिंसाचाराचे गालबोट लागले. पश्‍चिम बंगालमधील तीन मतदारसंघांमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथेही भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही राज्यांमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पश्‍चिम बंगालमध्ये कूचबिहार, अलिपूरदास आणि जलपाईगुडी या तीन मतदारसंघात हिंसाचार झाला. तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात ८०, तर भाजपने तृणमूल काँग्रेसविरोधात ३९ तक्रारी केल्या. हिंसाचार, मतदारांवर दबाव निर्माण करणे, निवडणूक अधिकाऱ्यांना दमदाटी असे आरोप दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर केले.

केंद्रीय पोलिस दलातील जवान भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करत असल्याचा आरोपही तृणमूलच्या नेत्यांनी केला. भाजपने मात्र हा आरोप फेटाळून लावताना, तृणमूलला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच असे आरोप केले जात असल्याचा दावा केला. दोन्ही गटांत मारामारी झाल्याचा आणि काही जण जखमी झाल्याचा दावा केला जात असला तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र हिंसाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले. छिंदवाडामध्ये काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे रिंगणात आहेत. या मतदारसंघातही भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचे वृत्त आहे.

मणिपूरमध्ये गोळीबार


इंफाळ : मणिपूरमध्ये दोन ठिकाणी मतदान केंद्राजवळ गोळीबार झाला. विष्णुपूर जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केंद्राजवळ गोळीबार केल्याने मतदार पळून गेले. यामुळे येथे अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागली. पश्‍चिम इंफाळ जिल्ह्यातही असाच प्रकार घडला. गोळीबार केल्यानंतर शस्त्रधारी हल्लेखोरांनी निवडणूक अधिकाऱ्यांनाही दमदाटी करत मतदारकेंद्र सोडून निघून जाण्यास सांगितले. अनेक ठिकाणी निवडणूक साहित्याची तोडफोडही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT