viral video A woman and her two children  
देश

Video: शेवटी आईचं काळीज! रेल्वे अंगावरुन जात असताना शरिराची ढाल करत मुलांना वाचवलं

व्हिडिओमध्ये दिसतंय की रेल्वे अंगावरुन जात असताना एक महिला आपल्या शरीराची ढाल करुन दोन लहान मुलांचं संरक्षण करत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारमधील बाढ रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की रेल्वे अंगावरुन जात असताना एक महिला आपल्या शरीराची ढाल करुन दोन लहान मुलांचं संरक्षण करत आहे. रेल्वे रुळावरुन जात असताना तिने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना सुरक्षित ठेवलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि तिची दोन लहान मुलं बेगुसराई येथून दिल्ली येथे निघाले होते. बागलपूर ते दिल्ली प्रवास करणारी विक्रमशीला एक्स्प्रेस रेल्वे फलाटावर आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने महिला तिच्या दोन मुलांसह रुळावर पडली. (viral video A woman and her two children miraculously survived after a train went over them at Bihar railway station)

तेथे असलेले लोक महिला आणि मुलांना मदत करु शकतील त्याआधीच रेल्वे स्टेशन सोडू लागली. त्यामुळे लोकांना काही करता आलं नाही. अशावेळी महिलेने आपल्या शरीराला ढाल करत दोन्ही मुलांचं संरक्षण केलं. रेल्वे आणि महिलेमध्ये अगदी काहीच इंचाचं अंतर असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. रेल्वे महिलेच्या जवळून जात असल्याचं दिसत आहे.

रेल्वे जेव्हा पुढे जाते तेव्हा लोक त्यांना वाचवण्यासाठी रुळावर उड्या मारतात. महिला आणि लहान मुलांना बाहेर काढलं जातं. महिला आणि लहान मुलांना त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सदर घटनेमुळे आई आपल्या जीवाची पर्वा न करता मुलांचं संरक्षण करत असते हे पुन्हा सिद्ध झालंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT