Viral Video esakal
देश

Viral Video : मुलीसोबत आईचाही झाला असता अपघात! पण...

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आपण नेहमी ऐकतो की, वेळ चांगला जात असेल तर सर्वात वाईट काळही निघून जातो. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडीओज आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही असंच काहीसं सांगायचं असेल. सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कुटुंबावर मृत्यू कसा भिरभिरत आहे, पण सुदैवाने ही घटना घडल्यानंतर त्यांना खरचटलेलं ही नाही. ही घटना आपल्या सर्वांशी जोडलेली आहे, कारण प्रत्येक घरात सिलिंग फॅन्स (Ceiling Fan) असतात आणि अनेकजण त्या पंख्याखाली बसतात आणि झोपतात.

सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडीओमध्ये एक कुटुंब एका छोट्या दुकानात बसल्याचं पाहायला मिळत आहे. लहान मुलीची आई आणि कुटुंबातील काही सदस्य जवळच आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या स्क्रीनमध्ये महिला आणि तिची मुलगी अगदी पंख्याखाली बसलेली दिसतात आणि काही सेकंदातच पंखा हळूहळू खाली पडू लागतो. या काळात कुणाचंही लक्ष त्या फॅनकडे जात नाही. शेवटच्या क्षणी मुलीची नजर पंख्याकडे जाते आणि मग ती काहीतरी बोलते.

पंखा पडणार हे घरच्यांना कळताच सर्वजण तिथून पळून जातात आणि छतापासून वेगळे होतात आणि पंखा जमिनीवर कोसळतो. नशिबाने कोणालाही इजा झाली नाही, संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. only._.sarcasm_नावाच्या एका अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला जवळपास हजारो लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT