देश

Viral Video: बेरोजगारी रोखण्यासाठी मोदी-योगींनी एकही मुल...; खासदाराचा व्हिडिओ डीपफेक असल्याचा भाजपचा दावा

Viral Video BJP MP Nirahua: भाजपचे आझमगडचे खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भाजपचे आझमगडचे खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी काँग्रेसवर यासंदर्भात आरोप केले आहेत. काँग्रेस डीपफेक व्हिडिओ वापरत असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. (Viral Video BJP MP Nirahua Saying)

व्हिडिओमध्ये दिनेश लाल यादव उर्फू निरहुआ म्हणताना दिसत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलांना जन्म न घालण्याचा निर्णय घेऊन बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेत्याच्या या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेत्याने एक्सवर शेअर केला होता. (Modi Yogi Not Produced Single Child To Stop Unemployment Is DEEPFAKE)

अमित मालविया यांनी सांगितलं की, व्हिडिओ हा डीपफेक आहे. तसेच याप्रकरणी काँग्रेसचे नेते श्रीनिवास बीव्ही यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमित मालविया यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मालविया म्हणालेत की, व्हिडिओ डीपफेक आहे. काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्यासाठी फेक व्हिडिओ शेअर करत आहे. लोकांमध्ये अशांतता आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादव याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतील. श्रीनिवास बीव्ही वारंवार असं कृत्य करत आहेत. आमच्याकडे स्क्रिनशॉट आणि व्हिडिओ रिकॉर्डिंग आहे. या माध्यमातून आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडू

मोदीजी आणि योगीजी यांनी एकही मुल जन्माला न घालून बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, त्यांना काही काम नाही ते अनेक मुलांना जन्म देत आहेत. अशा लोकांमुळेच बेरोजगारी वाढत आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं निरहुआ व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

भोजपुरी स्टार आणि आता राजकीय नेते झालेले दिनेश लाल यादव म्हणालेत की, खोटे व्हिडिओ शेअर करण्याचा काँग्रेसमध्ये ट्रेंड आला आहे. कोणीही व्हिडिओ पाहिला तर कळेल की ओठ काही वेगळं बोलत आहेत. एआयच्या मदतीने आवाजाचे क्लोनिंग करण्यात आले आहे.

हे ही वाचा:- (K Kavitha to judicial custody)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT