Viral Video esakal
देश

Viral Video : लग्नाआधी मेव्हणीने नवरदेवाला अडवलं! सगळ्यांसमोर अस काही केलं की...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

लग्नाच्या दिवशी केवळ वधू-वरच (Bride Groom) नव्हे, तर त्यांचे कुटुंबही विचित्र गोष्टी करून प्रसिद्धीमध्ये येतात. नववधूची बहीण नवरदेवसाठी आधीच काहीतरी वेगळं प्लॅन करते. जिजा आणि साली यांच्यातील मस्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण नेहमीच व्हायरल (Viral Video) झालेले पाहत असतोच. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मेव्हणीनं विचित्र पद्धतीनं नवर देवची एन्ट्री करताना एक प्लॅन आखला आहे. नवरदेव लग्नाच्या ठिकाणी पोहोचताच मेव्हणी त्याचा रस्ता अडवते.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असं दिसून येतयं की, नवरदेव नवरीला भेटण्यासाठी लग्नस्थळी धूमधडाक्यात येतो. मात्र, येथे त्याला नवरीच्या बहिणीला भेटावे लागते. नवरदेवाला हे माहित नसते की, एखादे मोठे काम त्याच्यासमोर येणार आहे, त्या कामामध्ये पास झाल्यानंतरच त्याला आतमध्ये प्रवेश मिळणार आहे.

मेव्हणी तिच्या नवरदेवाला त्रास देण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्येही पाहायला मिळाला. वरात घेऊन नवरदेव लग्नस्थळी पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या मेव्हणींनी त्याला अडवलं. इतकंच नाही तर मेव्हणीने नवरदेवासमोर प्रवेशासाठी अशी अट ठेवली, ज्यामुळे तो काही सेकंद उदास झाला. मेव्हणींने नवरदेवाला गोल पोळी बनवायला सांगते.

नवरदेवही बऱ्यापैकी हुशार निघाला आणि सर्वांसमोर त्याने गोल पोळी बनविण्यास होकार दिला. नवरदेवाने गोल पोळी करताच सर्वजण तेथे दंग झाले. हे अजब काम करून नवरदेवाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, कारण तो या टास्कमध्ये पास झाला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. _theweddingstories नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT