Viral Video  esakal
देश

Viral Video : कोंबडीने पिल्लांसाठी केले ससाणासोबत भांडण!

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होतोय.

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते आणि कोणाशीही लढू शकते. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कारण आई आणि मुलाचं नातं हे जगातीलं सर्वात घट्ट नातं आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो आई स्वत:च्या मुलाला वाचवण्यासाठी जीवही देऊ शकते आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी कुणाचा तरी जीव घेऊ शकते याचं उत्तम उदाहरण आहे.

हा व्हिडिओ कोंबडीचा (Hen) आहे, ज्यामध्ये एक ससाणा (falcon) कोंबडीच्या पिल्लावर हल्ला करतो, मग कोंबडी तिच्या पिल्लांना वाचवण्यासाठी न घाबरता ससाण्यासोबत लढते आणि मग पुढे काय झाले हे पाहून तुम्हाला धक्का बसेल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोंबडीच्या पिल्लाच्या दिशेने एक ससाणा येताच कोंबडी वेळ न घालवता तिच्या चोचीने ससाणावर हल्ला करते की त्याचा श्वास थांबतो. हा व्हिडिओ पाहणे खूपच आश्चर्यकारक आहे.

हा व्हिडिओ naturegoesmeta नावाच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 5 लाख वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओवर लोक अनेक कमेंट्सही करत आहेत. एका युझरने लिहिले - आईसोबत पंगा घेतल्याचा हा परिणाम आहे. दुसऱ्याने लिहिले- कोंबडीने आपल्या मुलांना वाचवण्याचे धाडस दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT