देश

बॉस असावा तर असा! 22 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली मर्सिडीज

हा व्डिडिओ व्हायरल होताच लोकांनी मालकाचे कौतुक केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

केरळच्या एका व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्याला चक्क ४५ लाखांची मर्सिडीज बेंझ कार (Mercedes Benz car) गिफ्ट केली आहे. या कर्मचाऱ्याने २२ वर्ष कंपनीत का केल्याने त्याने हे गिफ्ट दिले आहे. केरळमधील इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंचे किरकोळ विक्रेते myGचे मालक एके शाजी यांनी सीआर अनिश यांना एसयूव्ही कार (Car) भेट दिली. मायजी स्थापन होण्याच्या आधीपासूनच अनीश शाजी कंपनीबरोबर काम करत होते. त्यांनी कंपनीत विविध पदांवर काम केले आहे. कंपनीचे मार्केटिंग, देखभाल आणि व्यवसाय विकास युनिट्सचा समावेश आहे. अनिश सध्या myG चे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून काम करतात. हा व्हिडिओ व्हायरल (Viral video ) झाला आहे.

शाजी यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात, myG सुरू करण्याच्या आधीपासूनच अनीश माझ्याबरोबर आहे. गेली २२ वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. तो माझी ढाल असून मोठा आधार आहे. त्याने मला कधीच निराश केले नाही. तो माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम करतो. पण त्याहीपेक्षा जास्त कामावर असलेला त्याचे संपूर्ण लक्ष आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे मला नेहमीच पाठिंबा मिळाला. मी अनिशला एक कर्मचारी म्हणून नव्हे तर भागीदार म्हणून वागवले." शाजी यांनी अनीशला त्यांच्या कुटूंबासह काळ्या रंगाची एसयुव्ही भेट देत व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी ही कार देताना त्याच्या कामाविषयी कौतुक केले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी मालकाचे कौतुक केले आहे. अशाप्रकारचे काम फक्त एक लिडरच करू शकतो असे एकाने म्हटले. तर, दुसरा म्हणाला, कर्मचाऱ्याच्या चांगल्या कामाची जाणीव ठेवत मालकाने केलेले हे काम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. अशा अनेक कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्थ; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

MP: पगार हवाय? मग वेळेवर ऑफिसला या! मुख्यमंत्र्याचा कडक इशारा; १० ते ६ ड्युटी आता अनिवार्य!

Google वर ‘Punch the Monkey’ सर्च केलंत का? क्यूट सरप्राइज पाहून हसू आवरणार नाही

Latest Marathi News Live Update : जालन्यात 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

Video : राकेशने तन्वीला किस केल्यावर राखीचं धक्कादायक कृत्य ! "काय मूर्खपणा.." प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT