देश

सरकारी नोकरीचा थाट; हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral

भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी अनेक ठिकाणी त्याचे पालन केले जात नाही

सकाळ डिजिटल टीम

भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी अनेक ठिकाणी त्याचे पालन केले जात नाही. प्रत्येक राज्याचे सरकार हुंडा प्रथा कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी हुंडा घेतला जात आहे. काही लोकं हुंडा घेणे हा हक्क मानतात. लग्नमंडपात हुंड्यावरून अडून बसणारे महाभाग आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील नवऱ्याच्या मागण्या बघून लोकं प्रचंड चिडले आहेत. मुलीकडच्यांनी मुलाच्या मागण्या मान्य न केल्याने ऐन लग्नातच हुंडा नाही दिला तर लग्न मोडण्याची धमकी मुलगा देत असताना व्हिडिओत बघायला मिळते. हा मुलगा सरकारी नोकरी करत असून त्याचे वडील शिक्षक आहेत.

ही घटना बिहारमधली असल्याचे सांगितले जाते आहे. या व्हिडिओत मुलगा-मुलगी स्टेजवर उभे आहेत. व्हिडिओ तयार करणारा माणूस लग्न करण्याचे कारण काय?असे विचारतो. तेव्हा आपली डिमांड पूर्ण न झाल्याने असं करत असल्याचे सांगतो. त्याला पैसे किंवा सामान अजूनही मिळालेले नाही. मुलीकडून एक चेन देण्याचे कबूल केले होते. तीही अजून मिळालेली नाही. मग मी कोणत्या आधारावर लग्न करू? असं तो म्हणत असताना दिसतो.

ट्विटरवर हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबराने शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात.जोपर्यंत देशात हुंडा मागण्याची लोभी मानसिकता कमी होत नाही तोवर Womens Day, Women Empowerment Day असं मानणं व्यर्थ आहे. अशा माणसांना शिक्षा होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT