Rahul Gandhi Viral Video
Rahul Gandhi Viral Video Sakal
देश

राहुल गांधी नाईटक्लबमध्ये काय करतायत? काँग्रेसने दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईटक्लबमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओवरून भाजपा राहुल गांधींवर जोरदार टीका करत आहे. याच व्हिडीओबद्दल आता काँग्रेसने स्पष्टीकरण देत टीकाही केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुर्जेवाला यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, राहुल गांधी नेपाळ या मैत्रीपूर्ण देशात एका पत्रकार मित्राच्या खासगी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. मला जेवढं माहित आहे, तेवढ्यावरून तरी मित्रमैत्रिणी, कुटुंब असणं, लग्नसोहळ्याला हजेरी लावणं हा आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा भाग आहे. लग्नसोहळ्यात सहभागी होणं हा अजूनतरी गुन्हा ठरत नाहीये. कदाचित उद्यापासून भाजपा लग्न सोहळ्यात सहभागी होणं आणि मित्रमैत्रिणी असणं हा गुन्हा ठरवेल. पण हे मला नक्की सांगा जेणेकरून आम्ही मित्रमैत्रिणींच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावण्याच्या सभ्यतेमध्ये आम्ही बदल करू.

या व्हायरल व्हिडीओमध्ये राहुल गांधी काठमांडू इथल्या एका क्लबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ नेपाळच्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्सचा असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करत हा व्हिडीओ शेअऱ केला आहे. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते, आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत, असंही मालवीय म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT