देश

Video Viral : वृद्ध व्यक्तीचा पाय घसरला अन् डोळ्यादेखत तो नाल्यातून वाहून गेला

बऱ्याचवेळा गटारामध्ये साचलेल्या पाण्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो आणि अपघातही होतात

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याचवेळा गटारामध्ये साचलेल्या पाण्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो आणि अपघातही होतात

पावसाळ्याच्या आधी नाले आणि गटारींची सफाई न केल्याने ते तुंबतात. परिणामी पाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहू लागते. यामुळे वाहतूक करताना नागरिकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. तसेच पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकवेळा ही परिस्थिती रस्ते अपघाताचे कारण बनते. बऱ्याचवेळा आपण असे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही पाहिलेले असतात.

गटारामध्ये साचलेल्या पाण्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. आपण असे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. त्यात नाल्यातून वाहून जाताना किंवा अंदाज न आल्याने ड्रेनेजमध्ये बुडल्याने लोकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती डोळ्यादेखत रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात वाहून गेला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाताना सावधान राहिले पाहिजे हे लक्षात येते. या व्हायरल व्हिडिओतून असं दिसत आहे की, सुरुवातीला एक दूचाकीस्वार वृद्ध व्यक्तीला रस्त्याच्या बाजूला सोडून पुढे जातो. त्यानंतर वृद्ध व्यक्ती हळूहळू पुढे सरकत येताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी तुंबलेले दिसत आहे. दरम्यान, वृद्ध व्यक्ती पाण्यात पाय ठेवत रस्त्याच्या कडेला येण्याचा प्रयत्न करत आहे.

ती व्यक्ती पाण्याच्या मध्ये उभी असल्याने स्वत:ला सांभाळता पुढे येताना दिसत आहे. मात्र पाण्याच्या प्रवाहात तोल गेल्याने ती व्यक्ती थेट नाल्यात पडली आहे. दरम्यान, यानंतर तिथे असणारे लोक त्यांच्या मदतीसाठी धावले. लोकांनी सतर्क राहून त्या वृद्धाला गटाराच्या दुसऱ्या उघड्या भागातून बाहेर काढले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT