viral video on screaming from hospital know truth behind this video at indore 
देश

Video: रुग्णालयातून मध्यरात्री येतो किंचाळण्याचा आवाज...

वृत्तसंस्था

इंदूर (मध्य प्रदेश): एका रुग्णालयातून मध्यरात्री किंचाळण्याचा आवाज येत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, कोणीतरी मुद्दामहून अफवा पसरवत असून, आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत, असे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले.

इंदूर येथील एमवाय हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलच्या तळघरातून कुणीतरी ओरडण्याचे आवाज ऐकू येत आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि डॉक्टरही घाबरले आहेत. शिवाय, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंद्वारे एक कहाणीही व्हायरल झाली आहे. यामध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी एक 90 टक्के भाजलेली महिला या रुग्णालयात आली होती. मात्र, उपचारादरम्यान तिचा तासांतच मृत्यू झाला. पण, त्या दिवसांपासूनच रुग्णालयात रात्रीच्या वेळी किंचाळण्याचा आवाज येत असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे रुग्णालयातील रुग्ण घाबरले आहे. त्यामुळे रूग्णालय प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला असून, एक तपास पथक स्थापन केले आहे. या पथकाने अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 'व्हायरल होत असलेला व्हिडीओ रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्स विभागात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या आवाजाचा होता. रोज रात्री ड्रेसिंग करताना हा रुग्ण ओरडायचा, आणि रात्री शांतता असल्यामुळे या रुग्णाचा आवाज घुमत होता.' दरम्यान, रुग्णालय प्रशासन भुत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. पी. एस. ठाकूर यांनी सांगितले की, रुग्णालयाची रचना जुनी आहे आणि व्हेंटिलेटर असल्यामुळे रुग्णांचा आवाज घुमत होता. यावरून कोणीतरी भुतांच्या अफवा पसरवत आहे. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT