Temple Fairs Karnataka
Temple Fairs Karnataka esakal
देश

Karnataka Election 2023: निवडणुकीपूर्वीच कर्नाटकात नवा वाद; जत्रेत बिगर हिंदू व्यापाऱ्यांवर बंदीची शक्यता?

सकाळ डिजिटल टीम

हसन, तुमाकुरू, चिक्कमंगळुर आणि शिवमोग्गा जिल्ह्यांमध्येही बिगर हिंदू व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Karnataka Election 2023 : निवडणुकीपूर्वीच कर्नाटकात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. राज्यात जत्रेदरम्यान गैर-हिंदू व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी सुरू झालीये.

गुब्बी श्री चन्नबसवेश्वर मंदिराच्या जत्रेत बिगर हिंदू व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं तुमकूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केलंय. श्री चन्नबसवेश्वर मंदिर मेळा हा तुमकूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रिय मेळ्यांपैकी एक आहे. कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणुकाही (Karnataka Assembly Election) होणार आहेत, त्यामुळं हा चर्चेचा विषय बनलाय.

या संदर्भात हिंदू संघटनांनी (Hindu Organization) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंदिर परिसराच्या 100 मीटर अंतरापर्यंत बिगर हिंदू व्यापाऱ्यांना व्यवसाय करू देऊ नये, असं आवाहन केलंय. यापूर्वी 14 जानेवारीला विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी मंगळुरु शहराजवळील कवुरू इथं एका धार्मिक मेळ्यावर मुस्लिम व्यापाऱ्यांविरोधात 'बहिष्कार बॅनर' लावले होते.

14 ते 18 जानेवारी या कालावधीत धार्मिक मेळा सुरू असतानाच श्री महालिंगेश्वर मंदिराच्या आवारात हे बॅनर लावण्यात आले होते. मंदिर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. या बॅनरमध्ये म्हटलं होतं, हिंदू धर्म आणि परंपरा मानणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांनाच व्यवसाय करण्याची संधी दिली जाईल. मूर्तीपूजेला 'हराम' मानणाऱ्याला इथं थारा नाही, असं बॅनरमध्ये लिहिलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: शेअर बाजाराची किंचित घसरणीसह सुरुवात; बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स वधारले?

Pakistan: बुडत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आता पाकिस्तानची नवी आयडिया; चक्क गांजा विकून चालवणार देश

SRH vs LSG : त्यांची बॅटिंग आधी असती तर... शर्मा आणि हेडच्या तांडव नृत्यावर क्रिकेटच्या देवाने दिला मोठा संकेत

Neuralink : न्यूरालिंक प्रोजेक्ट धोक्यात? रुग्णाच्या मेंदूत बसवलेल्या चिपमध्ये तांत्रिक अडचणी.. इलॉन मस्कच्या कंपनीने दिली माहिती

Shivani Surve: बिग बॉस फेम शिवानी सुर्वेचा तब्बल 9 वर्षांनंतर धमाकेदार कमबॅक; 'या' मालिकेत साकारणार भूमिका, पाहा प्रोमो

SCROLL FOR NEXT