Banke Bihari Temple Sakal
देश

Stampede In Banke Bihari Temple : मंगला आरतीवेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

सकाळ डिजिटल टीम

Banke Bihari Mandir Stampede : श्रीकृष्ण जन्माष्टमीला जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात होणाऱ्या मंगला आरतीवेळी झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे 1.55 वाजता ही घटना घडली. वर्षातून एकदा होणाऱ्या मंगला आरतीसाठी हजारो भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली.

मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले की, मथुरेच्या वृंदावन बांके बिहारी मंदिरात मंगला आरतीवेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि एकच खळबळ उडाली. यामध्ये एका महिलेचा तर, एका पुरुष भाविकाचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले असून, जखमी झालेल्या भाविकांना रामकृष्ण मिशन, ब्रज हेल्थ केअर आणि वृंदावन येथील सौ शैया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे

वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होत असतात. मात्र, जन्माष्टमीच्या दिवशी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे येथील हॉटेलमध्ये राहण्यास जागाही मिळत नाही. कालदेखील येथे आलेल्या भाविकांची संख्या अधिक होती. यामुळे अनेकांना फुटपाथवर झोपून रात्र काढावी लागली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून अधिकाऱ्यांना सूचना

मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरातील गर्दी लक्षात घेता सणांच्या दिवशी मंदिरांसह ठिकठाकाणी अधिक कडक व्यवस्था करण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील असे निर्देशही मुख्यमंत्री योगींनी गृह विभागाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

Kolhapur CBS Rada : कोल्हापूर सीबीएसवर एसटी नसल्याने प्रवासी संतापले, जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय प्रकरण

'गुप्तांगाला स्पर्श करणेही बलात्कारच'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ड्रायव्हरने दोन मुलींवर केला होता अत्याचार

Ichalkaranji Politics : निमित्त दिवाळी शुभेच्छा, कोल्हापूरचे दादा, इचलकरंजीच्या आण्णांना भेटले; मिशन झेडपी ते महापालिका काय झाली चर्चा...

SLW vs BANW: २ धावांत ५ विकेट्स पडल्या अन् बांगलादेशने हातचा सामना गमावला; श्रीलंकेने विजयासह आव्हान कायम राखले

SCROLL FOR NEXT