April fool esakal
देश

VIDEO कॉल करुन मित्राला करत होता 'एप्रिल फूल', गमवावा लागला जीव; जाणून घ्या नेमकं काय झालं?

April fool News: एप्रिलच्या महिन्यामध्ये अनेकजण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना एप्रिल फूल करत असतात.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- एप्रिलच्या महिन्यामध्ये अनेकजण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना एप्रिल फूल करत असतात. कधी हे एप्रिल फूल हलकेफूलके असते, पण काहीजण 'एप्रिल फूल' एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. एखाद्याला धक्का बसेल किंवा त्याच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे एप्रिल फूल देखील केले जातात. पण, काहीवेळा एप्रिल फूल जीवावर देखील बेतू शकते. (Was making April fool by video calling a friend)

मध्य प्रदेशमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एप्रिल फूलच्या नादात एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या मित्राला एप्रिल फूल करण्यासाठी एका मुलाने फाशी लावून घेत असल्याचं नाटक केलं. त्याने मित्राला व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ बनवताना अनावधानाने स्टूल निसटला आणि त्याला फाशी लागली. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. (lost his life Know what really happened)

दहावीत शिकत होता अभिषेक

मल्हारगंज पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना असून मुलगा दहावीत शिकत होता असं कळतंय. मल्हारगंजमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय अभिषेक रघुवंशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या मित्राला एप्रिल फूल करण्यासाठी त्याने फाशीची तयारी केली. त्यानंतर त्याने मित्राला व्हिडिओ कॉल केला आणि स्टूलवर उभा राहिला. फाशी घेत असल्याचं त्यानं मित्राला सांगितलं.

फाशीचं नाटक करत असताना स्टूल निसटला आणि अभिषेकला खरीच फाशी बसली. यात त्याचा मृत्यू झालाय. सदर घटनेनंतर मित्राने अभिषेकच्या घरच्यांना याची माहिती दिली. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. घटनास्थळाला सील करण्यात आलं आहे. घटनास्थळावरुन मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT