RahuL shewale eknath Shinde 
देश

2019 चा जाहीरनामा वाचून दाखवत शेवाळेंनी जाहीर केला शिंदेंना पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता खासदारांनी देखील बंड पुकारला आहे. दिल्लीत आयोजित बैठकीत शिवसेनेचे लोकसभेतील नवे गटनेते राहुल शेवाळे यांनी १२ खासदारांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली. (Rahul shewale News in Marathi)

राहुल शेवाळे म्हणाले की, आम्ही २०१९ मध्ये शिवसेना भाजप युतीतून निवडून आलो आहोत. शेवाळे यांनी २०१९ च्या निवडणुकीतील वचननामा वाचून दाखवत महाविकास आघाडीमध्ये तसं काहीच झालं नसल्याचं म्हणत एकनाथ शिंदेना पाठिंबा देत असल्याचं म्हटलं.

राहुल शेवाळे यांनी शिवसेनचा २०१९ लोकसभा निवडणुकीच्या वेळीचा जाहीरनामा वाचून दाखवला. हा जाहीरनामा उद्धव ठाकरे यांनीच बनवला होता. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडी झाली. त्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला. मात्र त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामध्ये २०१९ च्या जाहिरनाम्याचा कुठेही उल्लेख नव्हता. मात्र एकनाथ शिंदे यांनी जो हिंदुत्वाचा संकल्प केला, त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व १२ खासदार इथ हजर झालो आहोत, असं शेवाळे यांनी म्हटलं.

महाविकास आघाडीच्या काळात खासदाराचं खच्चीकरण झालं. मात्र त्या काळात शिंदे यांनी युडीच्या माध्यमातून पाठबळ दिलं. मात्र पक्ष नेतृत्वाकडून वेळ द्यायला हवा होता. तो देण्यात आला नाही, त्यामुळे हा प्रसंग ओढावला. नुकत्याच झालेल्या बैठकीत आम्ही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी आम्ही आमचा त्रास देखील उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवला. तसेच एनडीएसोबत जाण्याचा सल्ला दिला. मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसाठी ठाम होते, असंही शेवाळे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT