Congress President Election 2022 esakal
देश

Congress : निवडणुकीत चुरस वाढत असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; गेहलोतांबाबत म्हणाले..

'राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल, तर आम्ही त्यांचं स्वागत करू.'

सकाळ डिजिटल टीम

'राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल, तर आम्ही त्यांचं स्वागत करू.'

Congress President Election 2022 : साधारण 24 वर्षांनंतर काँग्रेसमध्ये (Congress) पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळं ही निवडणूक घेतली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात थेट लढत होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गेहलोत यांनी पहिल्यांदाच यावर थेट भाष्य करून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. तर, शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी आज आपला प्रतिनिधी पाठवून उमेदवारी अर्ज मागवला आहे. त्यामुळं या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पहायला मिळणार आहे. मात्र, असं असताना G-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं विधान केलं आहे.

'आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो, पण..'

काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे, तर फुल्ल टाइम अध्यक्षाची गरज आहे. अशोक गेहलोत जर एकाच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर राहिले तर आमचा विरोध राहील, असं त्यांनी म्हंटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो. पण, जो कोणी अध्यक्ष होईल तो निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल आणि त्यांनी फॉर्म भरला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही चव्हाण म्हणाले.

'काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा'

यावेळी चव्हाण यांनी सोनिया गांधींचेही आभार मानलेत. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा ही आमची मागणी पूर्ण झाली आहे. आता या निवडणुका पारदर्शीपणे पार पडाव्यात, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. अशोक गेहलोत एक ज्येष्ठ नेते आहेत, चांगले नेते आहेत. त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अजून ठरवायचं आहे. मात्र, त्यांना दोन्ही पदांवर कायम राहायचं असेल तर आमचा विरोध असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT