weather hits kashmiri apple production sakal
देश

काश्मिरात हवामानाचा फटका; नंदनवनातील सफरचंदांची लाली उतरली

काश्मिरात लहरी हवामानाचा फटका; उत्पादनावर परिणाम, निर्यात अनिश्‍चित

जावेद मात्झी -सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर : सफरचंद म्हटली की काश्‍मीर, हिमाचल प्रदेशाचा नयनरम्य परिसर आणि फळांनी लगडलेल्या बागा डोळ्यासमोर येतात. काश्‍मीरमध्ये सफरचंदाचे दरवर्षी २२ लाख टन वार्षिक उत्पादन घेतले जात असून भारतीय उपखंडातील हा सर्वांत मोठा सफरचंद उत्पादक प्रदेश आहे.

पण यावर्षी तापमानात झालेली अनपेक्षित वाढ ,त्यामुळे पडलेला जोरदार पाऊस, गारपीट आणि ढगफुटी तसेच खोऱ्यातील अन्य नैसर्गिक संकटांमुळे सफरचंदांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

फळ उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी काश्‍मीर खोऱ्यातील काही भागातील लहरी हवामानामुळे ७५ टक्क्यांहून अधिक उत्पादन अडचणीत आले आहे. उत्तर बारामुल्लामधील सोपोर आणि दक्षिण काश्‍मीरमध्ये पावसामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याने यंदा सफरचंदांची निर्यात करता येण्यासारखी स्थिती नाही, असे बारामुल्ला जिल्ह्यातील गुलजार अहमार या सफरचंद उत्पादकाने सांगितले.

दक्षिण काश्‍मीरमधील शोपियाँ, कुलगाम, पुलवामा येथे सफरचंदांच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर्षी कमी तापमान आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला आणि अद्याप अधूनमधून सुरू असलेला पाऊस यामुळे सफरचंदांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. फुलांच्या परागीभवनापासून ते फळांच्या विकासापर्यंतचा टप्पा विस्कळित झाला आहे, असे शेतकरी आणि फलोत्पादन तज्ज्ञांनी सांगितले.

सफरचंदाचे आर्थिक गणित

  • उच्च दर्जा, चव आणि अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी काश्मिरी सफरचंद ओळखली जातात

  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी

  • काश्‍मीरमध्ये वार्षिक २२ लाख टन उत्पादन

  • जम्मू-काश्‍मीरमधील उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी आठ ते दहा कोटी महसूल मिळतो

  • सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे आठ ते दहा टक्के वाटा

  • सुमारे सात लाख शेतकरी कुटुंबे (अंदाजे ३५ लाख लोक) फलोत्पादन क्षेत्राशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित

  • खोऱ्यातील सुमारे ५० टक्के कुटुंबे उत्पादन, विक्री, पुरवठा आणि निर्यात यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेली

  • रेड डेलिशस, गोल्डन, अमेरिकन, अंबर आणि महाराजी या जातींचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते

  • स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेव्यतिरिक्त बांगलादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, युरोप आणि मध्य पूर्व येथे काश्मिरी सफरचंदांची मोठी बाजारपेठ

पाऊस आणि कमी तापमानामुळे आमच्या भागात सफरचंदांच्या परागीभवनावर सुमारे ३० टक्के परिणाम झाला आहे. काश्मिरी सफरचंदांच्या देश-विदेशातील चाहत्यांना प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी या सफरचंदाची चव चाखता येईल की नाही, याबाबत शंका आहे.

- फयाझ अहमद, अध्यक्ष, फळ संघटना, सोपोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: रोहित पालची स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी; राज्यात प्रथम, सहायक वनसंरक्षक पदावर होणार नियुक्ती

Kolhapur Cold Wave : दिवसा तीव्र चटका आणि रात्री वाढणारी थंडी; कोल्हापुरात विचित्र वातावरणाचा फटका, थंडी आणखी वाढणार

Traffic Jam: बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी; अनेक तास अडकल्याने प्रवासी त्रस्त, पाच ते सहा किमी रांगा

DHURANDHAR COLLECTION: धुरंधरने केली बक्कळ कमाई! आतापर्यंतचं कलेक्शन वाचून थक्क व्हाल!

Truck Tempo Accident: पाथरी-पोखर्णी रस्त्यावरील अपघातात ट्रकचालक ठार; ट्रक टेंम्पो ट्रेलरची धडक, दोन तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT