weather rain forcast monsoon 14 victims of rain in 24 hours Gujarat sakal
देश

गुजरातेत पावसाचे २४ तासांत १४ बळी

देशात इतरत्रही पावसामुळे सावधानतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : देशात अनेक राज्यांमध्ये मॉन्सून चांगलाच सक्रिय झाला असून मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी अपघातही झाले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि कर्नाटकमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. केरळमध्येही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये पावसाने सर्वाधिक हानी झाली असून गेल्या चोविस तासांमध्ये या राज्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये पावसामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्छ, नवसारी आणि डांग जिल्ह्यांमधून जाणारे तीन राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच, पावसामुळे ५१ राज्य महामार्ग आणि इतर ४०० हून अधिक छोट्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी अपघात होऊन १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जुनागड, गीर सोमनाथ, डांग आणि अमरेली या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी चार तासांमध्ये ४७ मि.मी. ते ८८ मि. मी. पाऊस कोसळला. कच्छ, भरुच, नवसारी आणि तापी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये पुढील २४ तासांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ओडिशामध्येही दक्षिणेकडील नऊ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय पुरी आणि इतर बारा जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गजपती जिल्ह्यात आज दरड कोसळून दहा घरांचे नुकसान झाले.

पाऊसस्थिती

  • कर्नाटकच्या किनाऱ्यावर मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून आढावा

  • ओडिशामध्ये नऊ जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’

  • राजस्थानच्या पूर्व भागात मुसळधार

  • आसाममध्ये पूरस्थिती कायम

  • दिल्लीत पावसामुळे रस्त्यांवर पाणी

  • तेलंगणमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार, वार करत खून; अज्ञात मारेकऱ्यांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ..

Latest Marathi News Live Update : एकाच घरात दोन पक्ष; चंद्रपुरात पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक रिंगणात

Arvind Sawant : "त्यांना डॉबरमॅन म्हणायचे की मांजर?" अरविंद सावंतांचा सुधाकर बडगुजर यांना बोचरा सवाल

Marathwada Crime : मोबाइल घेण्यावरून वाद! आधी सिगारेटचे चटके दिले आणि नंतर चिरला गळा; चौघांवर गुन्हा, संशयिताला अटक

T20 World Cup 2026 : भारतात खेळा नाही तर...! ICC चा बांगलादेशला थेट इशारा, 'ती' मागणीही फेटाळली

SCROLL FOR NEXT