Weather Update
Weather Update esakal
देश

Weather Update : देशातील अनेक राज्यांत मान्सूनपूर्व पावसाची बरसात

सकाळ डिजिटल टीम

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व (Monsoon) पाऊस पडत आहे. त्यामुळं गेल्या काही आठवड्यांपासून लोकांना हैराण करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळू लागलाय. राजधानी दिल्लीत शुक्रवारी पहाटे झालेल्या मध्यम पावसामुळं तापमानात घट झालीय. हवामान खात्यानं (Weather Department) शुक्रवारी दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून वादळासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवलीय.

तर दुसरीकडं IMD नं ट्विट केलंय की, बंगालच्या उपसागरापासून ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतातील जोरदार वाऱ्यांच्या प्रभावाखाली 16 ते 18 जून दरम्यान आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, 17 जून रोजी अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि सिक्कीममध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 16 ते 19 जून दरम्यान तेलंगणा (Telangana), 16 ते 18 जून तामिळनाडू (Tamil Nadu) आणि 18 ते 20 जून दरम्यान दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) 20 जूनला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय.

पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळं 17 जून रोजी जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड आणि पंजाबमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीनं सांगितलं की, ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भ, तेलंगणाचा बहुतांश भाग, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाचा काही भागाकडं वाटचाल करत आहे.

स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, येत्या 24 तासांत राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआरच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. शिवाय बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, केरळ, तामिळनाडू, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दक्षिण गुजरात आणि दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.

मान्सूनसाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबई महापालिकेची अतिवृष्टीप्रसंगी यंत्रणा सज्ज झालीय. मुंबई पोलिसांनी शहर-उपनगरात बसवलेल्या ५३६१ 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आपत्कालीन विभागाची व्हिडिओ वॉलही सुरुय. त्याचबरोबर नागरिकांना आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्यासाठी '१९१६' क्रमांकाच्या ६० हंटिंग लाइन्सही तत्पर असणार आहेत. पालिकेची २४ प्रशासकीय कार्यालये, ६ मोठी रुग्णालये आणि २८ बाह्य यंत्रणांना जोडणाऱ्या ५८ हॉटलाइन्स कार्यरत आहेत. तसेच पुराची पातळी मोजण्यासाठी रडार लेव्हल ट्रान्समीटर बसविले आहेत. अग्निशमन दलाच्या ६ कमांड सेंटर्ससह ६ रेस्क्यू बोट, १२ कयाक, ४२ लाइफ जॅकेट, ४२ इफ्लेटेबल जॅकेट, ३० रिंग बॉईज तयार आहेत. तर प्रमुख चौपाट्यांवर ९३ लाइफगार्ड तैनात आहेत. कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर या ठिकाणी नौदलाची ५ पूरबचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, ‘एनडीआरएफ'च्या तीन तुकड्याही अंधेरी क्रीडा संकुलात तैनात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT